विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

सातारा- सातारा शहर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आई-वडिलांनी गणपती बघायला नेले नाही म्हणून युवतीने आत्महत्या केल्याचाही प्रकार घडला आहे.

वर्मासिंग मिश्रासिंग 45 बिहार व विश्वास जगन्नाथ सोडमिसे 55 केशव प्लाझा पंताचा गोट सातारा अशी मृतांची नावे आहेत. पिलेश्वरी नगर म्हसवे रोड येथे इमारतीच्या एका मजल्यावर सेंट्रिंगचे काम करताना पाय घसरून पडल्याने वर्मासिंग जबर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर सोडमिसे हे मनोरुग्ण होते. रविवारी दुपारी अचानक चक्कर आल्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावरून ते तोल जावून पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आई-वडिलांनी गणपतीला नेले नाही म्हणून लिंब येथे अल्पवयीन मुलीने नैराश्‍यातून विहरीत उडी मारून आत्महत्या केली. सुवर्णा तुळशीदास गुजर 17 पवळेश्वर माळ लिंब असे मृत युवतीचे नाव आहे. धनंजय राजाराम जमदाडे 51 यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आई-वडिलांनी गणपती बघायला जाण्यासाठी नकार दिल्याने सुवर्णाने नागेवाडी हायस्कूलच्या पिछाडीला अभ्यंकर यांच्या विहरीत उडी मारून आत्महत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)