विविध कार्यक्रमांनी सोमाटणेत बालदिन साजरा

सोमाटणे- मूक अभिनय, पोस्टर बनवणे, कोलाज तयार करणे अशा विविध मनोरंजनात्मक विषयांबरोबरच विविध सामाजिक संदेश देत सोमटणेत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मॅजिक बस इंडिया फाउंडेशन व बजाज ऑटो यांच्या विद्यमाने सोमाटणे ग्रामपंचायत सभागृहात हा उपक्रम राबवण्यात आला. बालदिनास सोमाटणे, साळुंब्रे, बेबड-ओहोळ आणि शिवणे येथील एकूण 137 मुले-मुली व पालक सहभागी झाले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व जीवन कौशल्य त्यांच्यात रुजावे, आपआपसात विचारांची देवाण-घेवाण व्हावी, या हेतूने बालदिनांचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मूक अभिनय, पोस्टर बनवणे, कोलाज तयार करणे, विद्यार्थ्यांनी पाणी आडवा-पाणी जिरवा, स्त्री-भ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समानता, प्रदूषण विषयावर आधारित पोस्टर तयार केले. याच बरोबर शेतकरी आत्महत्या, मोबाईल अती वापराचा दुष्परिणाम या विषयावर मूक नाटिका सादर केली. त्यामुळे मुला-मुलींना स्वतःची ओळख संभाषण कौशल्य आणि मुलगा-मुलगी समानता अशा विविध सामाजिक बाबींचे प्रबोधन करण्यात आले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये मुख्याध्यापक राजेंद्र लासुरकर यांनी मुलांनी सादर केलेल्या विविध पोस्टर, नाटिकांचे कौतुक केले. यापुढे मॅजिक बस तर्फे सुरू असलेल्या जीवन कौशल्य कार्यक्रमांमुळे मावळ तालुक्‍यातील गावात मुला-मुलींमध्ये अपेक्षित बद्दल दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली .

या कार्यक्रमाला सोमाटणे गावचे सरपंच गोकुळ गायकवाड, ग्रामसेवक राजेंद्र वाघमारे, अंगणवाडी पर्यवेक्षिका शुभांगी जोशी, मुख्याध्यापिका पुष्पा घोडके, शिक्षक सोपान बनकर आदी उपस्थित होते. मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी पराग येवले, प्रकल्प व्यवस्थापक विनोद भालेराव यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी प्रकल्प व्यवस्थापक विनोद भालेराव सिद्धार्थ पडघाण, हनुमंत डिकले, मयुरेश पवार, परमवीर शेंडगे, सुनील पवार, राकेश पवार, तेजस्विनी आंबूसकर, समुदाय समन्वयिका सविता मुऱ्हे, काजल मुर्हे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक राहुल आरे यांनी केले. सूत्रसंचालन नीलम जाधव तर वैभव खांबगावकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)