कामशेत – मावळ तालुक्‍यातील विकास सोसायट्या या फक्‍त शेती संदर्भात कर्ज देतात, पण या पुढील काळात व्यावसायिक विचार संस्थेने केला, तरच विकास सोसायट्या फायदेशीर राहतील, कारण मावळ तालुक्‍यातील शेतीचे क्षेत्र कमी होत चालले आहे, त्यामुळे पीककर्ज व वेगवेगळी शेती कर्जे भविष्यात कमी होतील व विकास सोसायट्या अडचणीत येतील, असे मत कोल्हापूर सातारा विकास सोसायट्यांच्या संचालक अभ्यास दौऱ्यात जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे याने व्यक्‍त केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणगले येथील यळगुड विकास सोसायटी व साताऱ्यातील कऱ्हाड तालुक्‍यातील रेठरे व कर्वे या सोसायट्यांची पाहणी केल्याने अनेक संचालकांच्या मनामध्ये आपल्याही विकास सोसायट्यांनी व्यावसायिक दृष्टीकोन ठेवावा, असा विचार आला. यळगुड संस्थेने दुग्धजन्य पदार्थ, बेकरी प्रोडक्‍टस, वेगवेगळे महिला उद्योग व रेठरे संस्थेने खत, बी-बियाणे, भात गिरणी, आयुर्वेदिक मेडिकल, ट्रॅक्‍टर, तसेच कर्वे संस्थेने मंगल कार्यालये, खाते बी-बियाणांसाठी वित्त पुरवठा करीत उत्तम व्यवसाय करीत असल्याने मावळातील विकास सोसायट्यांच्या संचालकांची देखील व्यावसायिक दृष्टीकोन समोर ठेवण्याची मानसिकता निर्माण झाली आहे.

या दौऱ्यामध्ये तालुक्‍यातील 10 बसमध्ये विकास सोसायट्यांचे चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक असे एकूण 509 लोक अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये जिल्हा भूविकास बॅंकेचे संचालक काळूराम मालपोटे, संभाजी टेमगिरे, पंचायत समिती सदस्य दतात्रय शेवाळे, तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रकाश पवार, दतात्रय शिंदे, किरण हुलावळे, मधुकर कंद, रमेश पिंगळे, उत्तम बोडके, विभागीय अधिकारी राजेंद्र आढारी, वसुली अधिकारी गणेश साबळे आदींचा सहभाग होता. या अभ्यास दौऱ्याचे नियोजन विकास अधिकारी व सचिव यांनी केले. सूत्रसंचालन गणपत भानुसघरे यांनी केले. दिलीप खेंगरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)