विविध उपक्रमांनी शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पुणे – शहरात शुक्रवारी सकाळी शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालये तसेच विविध संस्था, संघटनेच्या वतीने 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागात विद्यार्थ्यांकडून प्रभातफेरी काढण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले लेझीम पथकाचे सादरीकरण आणि घोषणांनी शहर दणाणले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर भाषणे, लेझीम पथकाचे सादरीकरण, मानवी मनोऱ्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच वाहन रॅली, रक्तदान शिबिरे विविध उपक्रम राबवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)