विविधा: सईद जाफरी

माधव विद्वांस

ज्येष्ठ चरित्र अभिनेते सईद जाफरी यांची आज जयंती.राम तेरी गंगा मैली, हिना, शतरंज के खिलाडी अशा हिंदी चित्रपटांसोबतच अनेक ब्रिटिश चित्रपटांमध्येही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवणारे भारतात जन्मलेले ब्रिटिश अभिनेते सईद जाफरी यांचा जन्म 8 जानेवारी 1929 रोजी पंजाबमधील मालेरकोटा येथे झाला.फेब्रुवारी 1951 मधे जाफरी कार्टूनिस्ट, लेखक किंवा ब्रॉडकास्टर म्हणून नशीब आजमावण्यासाठी नवी दिल्ली येथे आले.त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर उद्घोषक म्हणून यशस्वीरित्या ऑडिशन दिले.त्यांना 2 एप्रिल 1951 रोजी दरमहा रु ,250/-पगारावर नेमणूक देणेत आली.ऑल इंडिया रेडिओच्या बाह्य सेवांसह एक इंग्रजी उद्घोषक म्हणून त्यांनी रेडिओ करियर सुरू केले. परंतु रहाण्याची जागा घेण्यासाठी त्यांचेकडे पैसे नव्हते म्हणून जाफरीनी इमारतीच्या मागील बेंचवर रात्र घालविली.स्टेशन संचालक मेहरा मसानी यांनी अखेर त्यांना वाईएमसीएमध्ये रु. 30 दर महिना सामायिक खोलीत राहण्याची व्यवस्था केली.त्यांनी प्रवास करण्यासाठी सायकल विकत घेतली होती. लाघवी बोलणे, हसतमुख काहीसा मिश्‍कील स्वभाव असा चरित्रअभिनेता अशी प्रतिमा घेऊन हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा उमटविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती.शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली महाविद्यालयीन शिक्षणानंतर सईद यांनी युनिटी नामक नाट्य निर्मात्या संस्थेची स्थापना केली होती. यानंतर त्यांनी लंडन व अमेरिकेत नाट्यक्षेत्रातील शिक्षण घेतले. त्यांनी वर्ष 1957 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या कॅपिटल युनिव्हर्सिटी ऑफ स्पीच अँड ड्रामा येथून पदवी प्राप्त केली आणि व्हरमॉंटच्या विनोस्की येथील सेंट मायकेल प्लेहाउसमध्ये ग्रीष्मकालीन नाटकांमध्ये काम करण्यासाठी निवडले गेले. अमेरिकेच्या दौऱ्यात शेक्‍सपियरच्या नाटकात काम करणारे ते प्रथम भारतीय होते. भारतात परतल्यावर सईद यांनी अनेक

हिंदी व ब्रिटिश चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.1980 च्या दशकात त्यांनी ब्रिटिश टेलिव्हिजनवर द जॉनी इन द क्राउन अँड द फर पॅव्हेलियन्स व ब्रिटिश इंडियन सिटकॉम तंदूरी नाइट्‌स, व लिटल नेपोलियन ड़या मालिकेतून अभिनय केला. गांधी, शतरंज के खिलाडी, मसाला या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.त्यांनी लेखिका व अभिनेत्री असलेल्या मधुर जाफरी (मूळ नाव बहादूर ) यांचे बरोबर विवाह केला.बहादुर यांना युनायटेड नेशन्समध्ये टूर मार्गदर्शक म्हणून नेण्यात आले होते तर जाफरी भारत सरकारच्या पर्यटन कार्यालयासाठी जनसंपर्क कार्यालयात काम करीत होते.वयाच्या 86 व्या वर्षी 15 नोव्हेंबर 2015 रोजी लंडन येथे त्यांचे निधन झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)