विविधा: संतकवी दासगणु महाराज

योगेश काटे

भारतभूमी ही नररत्नांची खाण आहे. या भूमीत निःस्वार्थ तपोपूत, ऋषीमुनी, संतमहात्मे समाजहितैषी यांची अक्षुण्ण अशी परंपरेत आहे. याच परंपरत्ते संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, रामदास स्वामी अशी दीर्घ संतपरंपरा लाभलेला महाराष्ट्र. या सर्व परंपरेचे पाईक असलेले अवघा महाराष्ट्र ज्यांना “आधुनिक महिपती’ म्हणून ओळखतो. असे “प. पू. श्री दासगणु महाराज’ यांची जयंती तिथीनुसार नुकतीच झाली. (कार्तिक वद्य त्रयोदशी) महाराजांच्या साहित्यातून तत्त्वज्ञान, सामाजिक समन्वय, राष्ट्रविचार हे साध्या तसेच सरळ व रसाळ भाषेतून प्रगट होते. माणसाच्या ऐहिक वा पारलौकिक जीवनाचे कल्याण संतांच्या साहित्यातूनच होते. त्यांच्या सर्व प्रश्‍नांचे व समस्यांचे निराकरण संत साहित्य व जीवनातून होते. याला आधार महाभारताचा आहे.
“महाजनो गतः संपथाः।’
तसेच प.पू. महाराजांचे आहे. महाराजांच्या साहित्याचे वैशिष्ट्य सांगताना प.पू. स्वामी वरदानंदभारती म्हणतात, “”अध्यात्म शास्त्र मुळातच सामान्यांच्या ज्ञानशक्‍तीच्या पलीकडेचे अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे पण गूढ शास्त्र आहे. या शास्त्राच्या अभ्यासात सर्वच बालके आहेत. बालकाला जसे अन्न विशेषरीत्या शिजवून मऊ करून काऊचिऊच्या गोष्टी सांगत लहान घास करून पण अत्यंत वात्सल्याने भरवावे लागतेंत ज्ञानेश्‍वरांनी केला म्हणून त्यांना “माऊली’ म्हणतो. प.पू. महाराज याच परंपरेचे पाईक आहेत. प.पू. महाराज यांच्या साहित्याचे वैशिष्ट्ये म्हणजे सामाजिक समन्वय हे आहे. समाजातील कुप्रथा, अनिष्ट चालीरीती दंभ यांच्यावर त्यांची लेखणी अस्त्र बनते. महाराजांच्या साहित्यातून सामाजिक एकसंधता दिसून येते.
ज्यांना संमत शैव मत।
ते म्हणती उमानाथ।।
वैष्णव वदती लक्ष्मीकांत।
यवन इलाही बोलती।।


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)