#विविधा: शिकागो धर्मपरिषदेची 125 वर्षे 

माधव विद्वांस 
“माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनीनो…’
शिकागो धर्मपरिषदेत स्वामीजींनी हे वाक्‍य उच्चारले आणि सर्व सभेने उभे राहून टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. या घटनेला आज 125 वर्षे पूर्ण होत आहेत. दि. 11 सप्टेंबर 1893 धर्मपरिषदेमधील स्वामीजींचे भाषण खूप प्रभावी झाले. सरस्वती आणि शिवमहिमा स्तोत्रातील दोन महत्त्वाचे संदर्भांचे त्यांनी दाखले देत सभेवर पक्कड घेतली. “हिंदुस्थान म्हणजे भुताखेतावर, जादूटोण्यावर विश्‍वास ठेवणारा मागास प्रदेश’ एवढीच पाश्‍चात्य राष्ट्रातील लोकांची समजूत होती.
विवेकानंदानी आपल्या भाषणात हिंदू संस्कृतीच्या चांगल्या गोष्टी लोकांच्या पुढे मांडल्या. स्वामी स्वतः सुधारक विचारांचे होते त्यांनी कोठल्याही अंधश्रद्धेचे समर्थन केले नाही. श्रीकृष्णाचा कर्मयोग, सहिष्णुता, बंधुभाव, आदरभाव दाखविणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला घडविले. दि. 11 सप्टेंबर 1893 ला पहिले भाषण झाले अन त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी “धर्माधर्मातील कलहांचे मूळ’, 19 रोजी “हिंदूधर्म’, 20 रोजी “दरिद्री मूर्तिपूजक’,26 रोजी “बौद्धधर्माचा हिंदूधर्माशी संबंध’, 27 रोजी समारोप अशी त्यांची सहा भाषणे झाली.
हिंदू संस्कृतीकडे काहीशा तुच्छतेनेच पाहणाऱ्या पाश्‍चात्य जगातील लोकांना स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची वैचारिक महती पटवून दिली आणि हिंदू धर्माची पताका जागतिक क्षितिजावर फडकत ठेवली. शिकागो सर्वधर्मपरिषदचे विज्ञान विभागप्रमुख मर्विन मेरी स्नेल यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, स्वामीजींच्या भाषणामुळे परिषदेतील उपस्थित प्रतिनिधी व सामान्य अमेरिकन लोकांच्यावर हिंदुत्व विचारांचा मोठा पगडा बसला होता. परिषदेनंतर अमेरिकेत अनेक ठिकाणी विवेकानंदांची व्याख्याने आयोजित केली गेली व त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिथे जिथे ते जात होते तिथे तिथे त्यांना लोकांचा गराडा पडत असे.
त्यावेळी वीरचंदजी गांधी यांनी जैन धर्माबद्दल आपली बाजू मांडली त्यांचेही लोकांनी कौतुक केले. स्वामी विवेकानंद त्यांना आपला सहकारी मित्र मानत. ज्याप्रमाणे विवेकानंदांच्या विचाराने भगिनी निवेदिता प्रभावित झाल्या, त्याचप्रमाणे श्रीमती हॉवर्ड यांना वीरचंदनी प्रभावित केले.
वीरचंद यांच्या प्रेरणेने, हॉवर्डनी संपूर्ण शाकाहार आणि जैन जीवनशैलीचा स्वीकार केला. वीरचंद गांधी यांनी भारतीय महिलांच्या शिक्षणासाठी शिकागोमध्ये स्थापन केलेल्या संस्थेचे सचिवपद हॉवर्ड यांनी स्वीकारले होते. स्वामीजींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात तेंव्हापासून घर करून ठेवले होते व आजही तो आदर मनात आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)