विविधा: विवेकानंद शिष्या भगिनी निवेदिता 

 माधव विद्वांस 
भगिनी निवेदिता यांची आज पुण्यतिथी मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबल असे होते. त्यांचा जन्म 28 ऑक्‍टोबर 1867 रोजी उत्तर आयर्लंडमध्ये झाला. त्या भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या होत्या. अमेरिकेहून सर्वधर्म परिषद आटोपून भारतात येताना स्वामीजी काही काळ लंडन येथे थांबले होते. लंडन येथील लेडी इस्बेल मार्गेसन यांनी मार्गारेट एलिझाबेथ नोबल या आयरिश महिलेस विवेकानंदांचे वेदांतावरील प्रवचनास बोलाविले. त्या प्रवचनाने प्रभावित झाल्या. येशू ख्रिस्ताच्या तत्त्वांचे अभ्यासासाठी रोममध्ये जाऊन राहिल्या होत्या, पण त्या धर्मांचा दिव्यप्रकाश आणि चिरंतन सत्याच्या शोधात स्वामीजींच्या संपर्कात आल्या. ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांबद्दल त्यांना काही शंका निर्माण झाल्या. स्वामींच्या सल्ल्यानुसार बौद्ध साहित्याचाही त्यांनी अभ्यास केला व त्यामुळे त्या अधिक प्रभावित झाल्या.
स्वामींचे सूचनेवरून गौतम बुद्धाचे विचारही त्यांनी अभ्यासिले. स्वामीजींनी त्यांना सांगितले की भारतातील स्त्रिया अशिक्षित व रूढीने चालणाऱ्या आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन करावे त्या मूळच्या शिक्षिका असल्याने त्यांनी या कार्यात विवेकानंदांना साथ द्यायचे ठरविले व त्या भारतात आल्या. 22 जानेवारी 1898 रोजी त्या कोलकत्ता येथे आल्या. 17 मार्च 1898 रोजी मा शारदादेवी यांची त्यांनी गाठ घेतली 25 मार्च 1898 रोजी स्वामींचेकडून ब्रह्मचर्याची मार्गारेट यांनी दीक्षा घेतली तेव्हापासून त्या निवेदिता या नावाने प्रसिद्ध झाल्या. त्यांनी भारतात राहून मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले .त्या फक्त स्वामीजींच्या शिष्याच नव्हत्या तर सर्व भारतीयांच्या भगिनी होत्या.
सर जगदीशचंद्र बसू या वनस्पती शास्त्रज्ञाबरोबर त्यांनी भारतातील शेतीचाही अभ्यास केला. त्यांनी राष्ट्रीय कार्यात तरुणांना मार्गदर्शनही केले. महिला शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले सुरुवातीला लोकांचा विश्‍वास करणे कठीण होते, पण निवेदिताच्या प्रेमात, एक जादू होती की लोकांनी आपल्या मुलींना शिक्षित होण्यासाठी पूर्ण विश्‍वासाने त्यांच्याकडे पाठवले. कलकत्ता येथे झालेल्या बैठकीत पहिल्यांदा त्यांनी ‘भारताच्या आध्यात्मिक विचारांवर इंग्लंडवरील प्रभाव’ यावर आपले मत व्यक्‍त केले. श्रोत्यांच्या मनात त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर वाढून त्यांना लोक भारतीयच समजू लागले 13 ऑक्‍टोबर 1911 रोजी दार्जिंलिंग येथे त्यांचे निधन झले. दार्जिंलिंग स्टेशनवरून व्हिक्‍टोरिया फॉलकडे जाताना त्यांची समाधी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)