विविधा: विजया राजाध्यक्ष 

व्यंकटेश लिंबकर 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेली चौथी लेखिका म्हणजे डॉ. विजया राजाध्यक्ष (5 ऑगस्ट इ.स. 1933 – हयात) या मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक आहेत. त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात व एस.एन.डी.टी. विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती.

-Ads-

विजया राजाध्यक्ष महाविद्यालयात असताना त्यांची पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली. अधांतर हा त्यांचा पहिला संग्रह होता. त्यानंतर विदेही’, अनोळखी’, अकल्पित’, हुंकार’, अखेरचे पर्व’, उत्तरार्ध’, आधी…नंतर’ असे त्यांचे एकूण 19 कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विजयाबाईंची कथा प्रामुख्याने मध्यमवर्गीय परिवेशातील स्त्रीजीवन चित्रित करण्यावर भर देते.

विशिष्ट कालखंडातील प्रश्‍नांपेक्षा जन्म व मृत्यू या टोकांतील जीवनाचे प्रयोजन, स्त्री-पुरुषांची आणि आई-मूल, पती-पत्नी अशी कौटुंबिक नाती आणि त्यांनी जीवनाला दिलेला अर्थ, यांचा परोपरीने वेध घेणारी त्यांची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्‍त करते. तरल, काव्यात्म शैलीने त्यांची कथा वैशिष्ट्य्‌पूर्ण ठरते. समीक्षात्मक लेखनात कवितारती’, जिव्हार’ स्वानंदाचे आदिमाया’, करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’, संवाद’ ही पुस्तके प्रख्यात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)