#विविधा : राष्ट्रध्वजाचे निर्माते 

माधव विद्वांस 

दरवर्षी स्वातंत्र्यदिन अर्थात 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारीला वातावरण सर्वत्र तिरंगामय होऊन जाते. राष्ट्रध्वजासाठी अनेक लोकांनी प्राण दिले. पण याचा निर्माता कोण याची फार कमी लोकांना माहिती आहे. या कलाकारांचे नाव पिंगाली वेंकय्या. त्यांची जयंती नुकतीच 2 ऑगस्ट रोजी झाली. (जन्म दिवस :2 ऑगस्ट 1876). आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील भटलापेन्नुमारू येथे हनुमंतरायुडू आणि वेंकटरत्नम्मा या दांपत्याच्या पोटी पिंगाली यांचा जन्म झाला. ते लहानपणापासून कुशाग्र व चौकस बुद्धीचे होते. मासुलीपटनम्‌ येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. वयाच्या 19 व्या वर्षीच ते लष्करात भरती झाले होते. ते शेती तज्ज्ञही होते. ते उच्च शिक्षणासाठी लाहोर येथे गेले. उत्तर हिंदुस्थानातील पाच वर्षांच्या काळात त्यांचा क्रांतिकारकांशी संबंध आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दादाभाई नवरोजी यांच्याही संपर्कात ते आले. पुढे आफ्रिकेत त्यांचा म. गांधीजींशी संबंध आला; तो पुढे कायम राहिला. सन 1916-1921 या कालावधीत पिंगाली यांचा कॉंग्रेस चळवळीशी संबंध आला. त्यावेळी राष्ट्रध्वजाची कल्पना त्याना सुचली व 30 देशांचे राष्ट्रध्वजांचा अभ्यास करून त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज बनविला.

त्यापूर्वी सन 1904 मध्ये भगिनी निवेदिता यांनी लाल व पिवळ्या रंगातील ध्वजावर बंगाली भाषेत “वंदे मातरम्‌’ लिहिलेला ध्वज तयार केला होता. त्याचे 1906 मध्ये कलकत्त्यातील पारसी बगान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे ध्वजारोहण झाले होते. पिंगाली यांनी अत्यंत आकर्षक सुटसुटीत दोनच रंगाचे आकर्षक संकल्पचित्र तयार केले. बेझवाडा येथे 31 मार्च आणि 1 एप्रिल 1921 या दोन दिवशी झालेल्या ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे बैठकीवेळी पिंगाली वेंकय्या नवा ध्वज घेऊन गांधीजींकडे गेले. गांधीजींनी तो पसंत केल्यावर अनेक वर्षे तो कॉंग्रेस बैठकीत फडकविला जाई. जालंधरचे हंसराज यांनी चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा, अशी सूचना केली. त्यानंतर गांधीजींनी पांढरा रंग मधल्या भागात समाविष्ट करून त्यावर चरखा ठेवला.

दिनांक 22 जुलै 1947 रोजी घटनासमितीच्या बैठकीत “तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खाली गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. पांढऱ्या पटट्ट्यावर निळ्या रंगाचे 24 आरे असलेले अशोकचक्र आहे. हाच आपला अधिकृत राष्ट्रध्वज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)