विविधा: यशवंत देव 

माधव विद्वांस 

सगळ्यांचे लाडके लेखक, कवी, गीतकार, संगीतकार व आकाशवाणीच्या सिग्नेचर ट्यून बनविणारे यशवंत देव यांचे मंगळवार दि. 31 ऑक्‍टोबर रोजी निधन झाले. योगायोग म्हणजे आज 1 नोव्हेंबर ही त्यांची जयंती. देव यांचा जन्म जन्म 1 नोव्हेंबर 1926 रोजी झाला. ते मुंबई येथे झाला. त्यांचे संगीतविषयक शिक्षण मुंबईतच झाले होते. तसेच गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी पण त्यांनी प्राप्त केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांचे वडील हेच त्यांचे संगीतातील पहिले गुरु. ते विविध वाद्ये वाजवण्यात वाकबदार होते. पण त्यांतही त्यांना तबला जास्त आवडायचा. त्यामुळे देवांना संगीताचे बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले. गजाननराव वाटवे व जी. एन. जोशी यांचाही त्यांच्यावर प्रभाव पडला होता. सतारवादक म्हणून आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात देव यांनी आपली कारकीर्द सुरू केली. ते परिचित झाले, ते त्यांच्या आकाशवाणीवरील “भावसरगम’ या कार्यक्रमाच्या सिग्नेचर ट्यूनमुळे. त्यांनी धारवाड, नागपूर व मुंबई आकाशवाणीवर वर्ष 1958 ते वर्ष 1984 या प्रदीर्घ कालावधी मधे संगीततकार व निर्माते म्हणून काम केले .

संगीतकार कॉफमॅन हे 1930च्या मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्‍चिमात्य संगीत विभागात काम करत होते. त्यांनी कार्यक्रम सुरु होण्याआधी वाजवायची सिग्नेचर ट्यून प्रचलित केली. तंबोरा आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर यात करण्यात येत असे. त्यावेळी “आपली आवड’, “कामगार सभा’, “युववाणी’, “भावसरगम’, “वनिता मंडळ’ आदी सर्वच कार्यक्रमांच्या सिग्नेचर ट्यून्स लोकप्रिय झाल्या.त्यात ‘भावसरगम’ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यून यशवंत देव यांनी केली. या कार्यक्रमाला अफाट लोकप्रियता मिळाली. आताच्य सारखे दूरदर्शनचे व अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम त्यावेळी नव्हते. आकाशवाणी हाच मनोरंजनाचा श्रोत्यांसाठी आधार होता.

देव स्वतः गीते लिहीत तसेच त्याला संगीतही देत असत. त्यांनी स्वतः लिहिलेले संगीतबद्ध केलेले यमन रागातील लता मंगेशकर यांनी गायलेले “काम पुरता मामा’ या चित्रपटातील “जीवनात ही घडी अशीच राहू दे…’ हे गाणे खूपच गाजले. सुधीर फडके यांनी गायलेले प्रभाकर जोग यांनी संगीतबध्द केलेले “प्रिया आज माझी नसे साथ द्याया…’ हे त्यांचे भावगीत आजही रसिकांच्या ओठावर आहे. यशवंत देव यांनी संगीत दिलेल्या गीतांपैकी किमान 90 टक्‍क्‍यांहून अधिक गीते सुपरहिट आहेत. म्हणूनच ते खरोखरचे “महाराष्ट्र भूषण’ या सन्मानाला अत्यंत पात्र आहेत. अशा या दिग्गज “देवस्वरुप’ संगीतकाराला भावसुमनांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)