विविधा: बहुभाषिक संगीतकार डॉ. के. जे. येसुदास

माधव विद्वांस

दिल के टुकड़े-टुकड़े करके हे अवीट गोडीचे गीत संगीतबद्ध करणारे संगीतकार व पार्श्‍वगायक डॉ. के.जे. येसुदास यांचे आज अभीष्टचिंतन. त्यांचा जन्म कोचीन येथे 10 जानेवारी 1940 रोजी झाला. त्यांच्या वडिलांना त्यांच्या मुलाने पार्श्‍वगायक बनावे, अशी इच्छा होती. त्यांचे वडील एक सुप्रसिद्ध मल्याळम शास्त्रीय संगीतकार आणि स्टेज अभिनेता होते व तेच त्यांचे पहिले गुरू होते. संगीत अकादमी, त्रिपुनीथुरा, त्यानंतर त्यांनी स्वाति थिरुनल कॉलेज ऑफ म्युझिक, थिरुवनंतपुरम येथे शिक्षण घेतले. काही काळ कॅरेटिक संगीत मास्टर दिवंगत के. आर. कुमारस्वामी अय्यर आणि दिवंगत सेमंगुडी श्रीनिवास अय्यर यांचेकडे शिक्षण घेतले पण आर्थिक अडचणीमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. थोड्या काळासाठी त्यांनी श्री व्हीचूर हरिहर सुब्रमण्यम अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिकले, त्यानंतर त्यांनी चेंबई वैद्यनाथ भागवतार कडून प्रगत प्रशिक्षण घेतले.त्यांनी गानभूषण हि पदवी प्राप्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येसुदास यांनी 14 नोव्हेंबर 1961 रोजी मल्याळम भाषेत ‘जाथी भाधेम मथ दशश्‍मन’ हे पहिले लोकप्रिय गीत गायले व कारकिर्दीस सुरुवात केली. हिंदी अतिरिक्‍त मल्याळम, तमिळ, कन्नड, तेलगू, बंगाली, गुजराथी, उडिया, मराठी, पंजाबी, संस्कृत, अरबी भाषांतून सुमारे 80,000 गीतांना संगीत दिले आहे. एकाच दिवशी त्यांनी 16 गाणी संगीतबद्ध केली आहेत. वर्ष 1965 मध्ये सोव्हिएत युनियन सरकारने यूएसएसआरच्या विविध शहरांमध्ये त्यांच्या संगीत मैफिलींचे आयोजन केले होते. तसेच रेडिओ कझाकिस्तानवर रशियन गाणे देखील गाजविले. 1970 मध्ये ते केरळ संगीता नाटक अकादमीचे अध्यक्ष झाले. या पदावर काम करणारे ते सर्वात तरुण व्यक्‍ती होते. दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये गाण्याच्या एक दशकानंतर, त्यांनी 1970 च्या दशकाच्या सुरुवातीस बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळवला. जय जवान जय किसान (1971) या चित्रपटासाठी त्यांनी पहिले हिंदी गीत संगीतबद्ध केले. परंतु “छोटीसी बात’ हा चित्रपट त्यांनी दिलेल्या संगीताचा चित्रपट अगोदर प्रदर्शित झाला.

तो चित्रपट गाण्यामुळेही गाजला व त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत नाव भक्कम झाले. अमिताभ बच्चन, अमोल पालेकर आणि जितेंद्र यांच्यासह हिंदी सिनेमातील अनेक अग्रगण्य कलाकारांसाठी त्यांनी हिंदी गाणी गायली आहेत. त्यांनी रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, खय्याम, राजकमल आणि सलील चौधरी यांच्यासह संगीत संचालनासह अनेक सदाहरित हिंदी चित्रपट गाणी गायली आहेत. येसुदासांचे पत्नीचे नाव प्रभा आहे. त्यांचे तीन मुलगे – विनोद, विजय आणि विशाल. दुसरा मुलगा विजय येसुदास हा एक गायक व संगीतकार आहे त्याला 2007 मधील सर्वोत्कृष्ट पुरुष गायक ‘केरळ स्टेट फिल्म ऍवार्ड’ मिळाले आहे. येसुदास सर्वोत्कृष्ट गायन क्षेत्रात सात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ते एकमेव गायक आहेत. त्यांना
सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायक म्हणून आठ वेळा, फिल्मफेअर ऍवार्ड पाच वेळा आणि केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या राज्य सरकारांनी दिलेल्या पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगरसाठी राज्य पुरस्कारासाठी तीनवेळा पुरस्कार मिळाला. तसेच त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने भारत सरकारने गौरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)