#विविधा: पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी 

माधव विद्वांस 

भारताच्या डॉक्‍टर कमलाबाई सोहोनी (जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ) यांचे आज पुण्यस्मरण (निधन 8 सप्टेंबर 1997 नवी दिल्ली; जन्म 18 जुलै 1911 इंदूर) दुर्गा भागवत यांच्या त्या थोरल्या भगिनी. त्यांचे वडीलही रसायनशास्त्रज्ञ होते. तेलापासून तूप बनविण्याचे तंत्र त्यांनीच शोधून काढले होते. रसायनशास्त्रात पदवी परीक्षा पहिल्या वर्गात पास झाल्यावर शास्त्रीय संशोधनासाठी बंगलोर येथील टाटांनी 1911 मध्ये स्थापन केलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स’मध्ये अर्ज केला होता. पात्रता असूनही केवळ मुलगी असल्याने त्यांना प्रवेश देता येत नसल्याचे सर सी. व्ही. रामन यांनी कळविले.

‘मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही, असे कमलाबाई यांनी रामन यांना ठणकावुन सांगितले. अखेर त्यांना एक वर्षासाठी प्रवेश देणेत आला. पुढे त्यांनी स्प्रिंगर रिसर्च’ आणि ‘सर मंगलदास नथूभाई’ या मुंबई विद्यापीठाच्या शिष्यवृत्त्या मिळविल्या व इंग्लंडला गेल्या.तेथे नोबेल पारितोषिकविजेते सर फ्रेड्रिक गॉलन्ड हॉपकिन्स यांची भेट घेऊन संस्थेत प्रवेश देण्याची विनंती केली. त्यांनी सर्व जागा भरल्या आहेत, मोकळी जागा दिसली तर तुम्हीच मला सांगा, असे सांगितले. तेव्हा तेथील एक शास्त्रज्ञ डॉ. रिक्‍टर यांनी त्यांची जागा सोडण्याची तयारी दर्शविली.

पहिले सत्र संपताच सोहोनी यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. ‘प्राणिमात्रांप्रमाणे सर्व वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया ‘सायटोक्रोन-सी’च्या मध्यस्थीने एन्झाइम्समुळे होतात’, हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन सादर करून 1939 साली केंब्रिज विद्यापीठाची पीएच्‌.डी. संपादन केली. नंतर डॉ. कमलाबाई मायभूमीच्या प्रेमाने भारतात परत आल्या. दिल्लीच्या ‘लेडी हार्डिंग्ज कॉलेज’ या संस्थेत त्या प्राध्यापक म्हणून हजर झाल्या. येथील जागा त्यांच्यासाठी डॉ. हॉपकिन्स यांच्या सूचनेनुसार 1938 सालापासून राखून ठेवण्यात आली होती. सन 1939 मध्ये त्या आपल्या नोकरीवर रूजू झाल्या.पुढे “रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स’ मुंबईच्या या संस्थेच्या निदेशक म्हणून त्या निवृत्त झाल्या. नीरेमधील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, आणि लोहाचे अस्तित्व त्यांनीच शोधून काढले. 

शास्त्रज्ञ कमलाबाईंना अभिवादन. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)