#विविधा: पंडित विष्णू दिगंबर पलुसकर

माधव विद्वांस

संपूर्ण भारतात संगीताचा प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी केली. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरिता आणि प्रसाराकरिता पलुसकरांचे खूपच मोठे योगदान आहे. विष्णू दिगंबर पलुसकरांचे ग्वाल्हेर गायकीवर प्रभूत्व होते. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट रोजी कुरुंदवाड येथे झाला. त्यांचे वडील कीर्तनकार होते व भजनेही गात असत. कुरुंदवाडचे राजे पटवर्धन यांनी त्यांच्यातील गुणवत्ता ओळखून पारखून बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचेकडे शिक्षणासाठी पाठविले. तेथे त्यांनी 12 वर्षे साधना केली.

ब्रिजभाषेच्या अभ्यासासाठी ते मथुरेतही जाऊन राहिले होते. पंडित चौबे यांचेकडे ते धृपद गायकी शिकले. ग्वाल्हेर, बडोदा येथे संगीताला खूप प्रोत्साहन मिळत असे तेथे त्यांनी राजदरबारी गायनसेवा दिली. सन 1901 मध्ये त्यांनी लाहोरमध्ये संगीत विद्यालयाची स्थापना केली. नंतर ते मुंबई येथे आणले. सन 1947 साली मिरज येथे प्रशासकीय कार्यालय स्थापले. श्री दत्तजयंती उत्सवात एका अपघातात त्यांचे दोनही डोळे गेले होते.

पं. ओंकारनाथ ठाकुर, पं. नारायण राव, त्यांचे पुत्र डी.वी. पलुस्कर, पं. यशवंतबुवा मिराशी, पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्यासारखे दिग्गज त्यांचेकडे शिकले. हिंदुस्थानी रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली. त्यांनी 18 खंडांमधे स्वरलिपी संकलित केली केली, जी ‘पलुसकर-पद्धती’ म्हणून ओळखली जाते. तीन खंडामध्ये संगीत बाल प्रकाश नावाचे संगीतावर पुस्तक लिहिले. त्यांनी संगीत वाद्य या विषयावर सुमारे 26 पुस्तके लिहिली. त्यांनी भारतातील विविध गायन पद्धतींचा भारतभर फिरून अभ्यास केला. ते 1930 साली नेपाळला जाऊन आले. विविध वाद्यांच्या निर्मितीसाठी त्यांनी ‘वर्कशॉप’ पण काढले तसेच प्रदर्शन वाद्यांचे प्रदर्शनही भरविले होते.

श्रीरामावर सामूहिक कीर्तन तसेच रामचरितमानसचे संगीतमय प्रवचन दिले. कॉंग्रेसच्या अधिवेशनात ‘वंदेमातरम्‌’ व अन्य गीतेही सादर केली होती. तुलसीदास, कबीर, सूरदास यांची भजनेही निरनिराळ्या रागामधून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात गायली. दिनांक 21 ऑगस्ट 1931 रोजी त्यांचे निधन झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)