#विविधा: नानाजी देशमुख 

माधव विद्वांस 
नानाजी देशमुख (चंडिकादास अमृतराव देशमुख) यांची आज जयंती.(जन्म 11 ऑक्‍टोबर 1916; निधन 26 फेब्रु 2010.) त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी झाला.विनोबांच्या भूदान चळवळीत त्यांचे बरोबर प्रचार करण्यासाठी गेले होते.
नानाजी फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणून त्यांचे महान कार्य दुर्लक्षित झाले. पण इंदिरा गांधींना नानाजी देशमुख व एकनाथजी रानडे (विवेकानंद स्मारक निर्माते) यांच्याबद्दल खूप आदर होता.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावाद संकल्पनापूर्तीसाठी नानाजीनी 1972 मध्ये दीनदयाळ शोधसंस्थेची स्थापना केली.ते महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पण त्यांचे कार्यक्षेत्र 50 व्या दशकापासून उत्तर प्रदेशातच राहिले. आणीबाणी असताना भूमिगत होऊन साताऱ्यात येऊन राहिले होते.
वर्ष 1977 मध्ये नानाजी बलरामपूर संघातून लोकसभेवर निवडून गेले.जनता सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यावर पक्षातील लाथाळ्या पाहून त्यांनी राजकीय संन्यास घेतला व पूर्ण वेळ समाज कार्यास वाहून घेतले.
नानाजी देशमुख यांनी 40,000 कूपनलिकांच्या माध्यमातून उत्तर प्रदेशामधील गोंडा जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. 26 जानेवारी 2005 पासून चित्रकूट प्रकल्पाच्या माध्यमातून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागात दुर्गम भागातील आदिवासींसाठी त्यांनी शैक्षणिक, वैद्यकीय, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी चित्रकूट येथे जाऊन पाहून प्रशंसोद्‌गार काढले होते. वर्ष 1999 मध्ये “पद्मविभूषण’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच रामशास्त्री प्रभुणे पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते.
शेतीप्रधान देश असल्याने व खेड्यात राहणारे लोकांचे जीवनमान उंचाविणे हा उद्देश ठेवून, पाणी आडवा व जिरवा यातून सिंचनक्षेत्रात वाढ, स्त्रियांना गृहोद्योग, गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतींचा विकास, गुरुकुल पद्धतीचे शिक्षण, तसेच उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य दिले. आरोग्यधाम योजनेच्या माध्यमातून
आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन असे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात त्यांनी अमलात आणले आहेत.
विकासकामांव्यतिरिक्त दीनदयाळ उपाध्याय संस्थेने तंटा मुक्‍त समाज संस्था स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन 80 गावांतील लोकांची तडजोडी करून कोर्ट कामापासून लोकांचे आर्थिक व वेळेची बचत केली आहे. ते विज्ञानवादी होते त्यांनी आपला देह धार्मिक संस्कार न करता आयुर्विज्ञान संस्थेला द्यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार देहदान करण्यात आले. समाजसेवकास अभिवादन.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)