#विविधा: दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी 

माधव विद्वांस 
1 सप्टेंबर 1939 रोजी पोलंडवर जर्मनीने हल्ला केला व दुसऱ्या महायुद्धास तोंड फुटले. जर्मनीने रशियाबरोबर मैत्री करार करून पूर्व सीमा शांत ठेवण्याचे राजकारण केले, तसेच इटलीच्या बेनेटो मुसोलिनीस हाताशी धरून दक्षिण बाजू भक्‍कम केली व युरोपमध्ये घुसखोरी सुरू केली. त्याआधी (1937) जपानने चीनवर आक्रमण करून आपली साम्राज्य लालसा वाढीला लावली होती व आग्नेय आशियात मुसंडी मारण्यास सुरुवात केली. सोविएत संघाने 17 सप्टेंबर रोजी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली.
हिटलरची युरोप जिंकण्याची कल्पना येताच 3 सप्टेंबर रोजी प्रत्युत्तर म्हणून ब्रिटन व फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. एका वर्षातच जर्मन सैन्याने नॉर्वे, नेदरलॅंड्‌स, बेल्जियम व फ्रान्स जिंकले. जून 1941 पर्यंत जवळ जवळ सर्व युरोप जर्मनांचे अधिपत्याखाली आला. इटलीने आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहतीवर हल्ले सुरू केले होते. पण पूर्वेला ब्रिटिश बेटावर रॉयल एअर फोर्स व रॉयल नेव्हीने दिलेल्या कडव्या प्रतिकारामुळे जर्मनांना ब्रिटन घेता आले नाही. 22 जून 1941 रोजी अचानक रशियावर हल्ला करून जर्मन सैन्य मॉस्कोच्या वेशीवर पोहोचले पण रशियाचा प्रतिकार सुरू झाला. 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने अमेरिकेच्या पर्ल हर्बर वर हल्ला करून अमेरिकेची खोडी काढली व अमेरिकेने युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला. जर्मन, जपान व इटली एका बाजूला व दुसऱ्या बाजूस इतर 70 देश असे महायुद्ध पेटले. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट यांनी दोस्त राष्ट्रांची फळी उभारून जर्मनी जपान व इटलीला नामोहरम केले.
ऑगस्ट 1943 मध्ये जर्मनीच्या रोमेलने कॅथेरीनपासच्या लढाईत दोस्त सैन्याला चकविले होते पण ट्युनिशियातील लढाईत मात्र जर्मन फिके पडले व अडीच लाख सैनिकानी शरणागती पत्करली. त्यात बहुसंख्य इटालियन होते व भूमध्य सागरातील लंबक दोस्त राष्ट्रांचे बाजूने झुकला. आफ्रिकन लढाईत भारतीय सैन्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. दोस्त राष्ट्रांचे सैन्य इटलीच्या दाराशी येऊन ठेपताच इटलीतील मुसोलिनीचे सरकार गडगडले. राजा व्हिक्‍टर इमॅन्युएल तिसऱ्याने मुसोलिनीला पदच्युत केले व ग्रेट फॅसिस्ट काउन्सिलच्या संमतीने त्याला अटकही करवली.
इटलीतील जर्मन सैन्याने शरणागती पत्करल्यावर मुसोलिनीने स्वित्झर्लंडला पळ काढण्याचा प्रयत्न केला पण इटलीतील क्रांतिकाऱ्यांनी त्याला पकडले व त्याची सोबतीण क्‍लारा पेटाचीसह त्यांना मृत्युदंड दिला. त्यांचे मृतदेह मिलानला नेण्यात आले व जाहीर स्थळी उलटे टांगण्यात आले. 16 एप्रिल 1945 रोजी लाल सैन्याने पोलिश सैन्याच्या 78,556 सैनिकांसह बर्लिनवर आक्रमण केले. 24 एप्रिलला सोविएत सैन्यातील तीन फौजांनी बर्लिनला पूर्णपणे वेढा घातला. शर्थीचा प्रयत्न म्हणून हिटरलने नागरिकांना फोक्‍सस्टर्म संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)