विविधा : दत्ता महाडिक पुणेकर   

माधव विद्वांस

ग्रामीण भागातील थकल्या भागलेल्याना विनोदांची फुंकर घालणारे लोकनाट्य अभिनेते ,गायक,संगीतकार दत्ता महाडिक पुणेकर यांची आज जयंती. आंधळं म्हणतंय फुटलं तांबडं… मोमीन कवठेकर यांनी लिहिलेल्या या लोकगीताला संगीताचा व आपल्या आवाजाचा बाज देऊन अस्सल गावरान शब्दात दत्ता महाडिक सादर करायचे. पुणेकर जी गाणी गात असत त्यातील बहुतांशी कवने लोकगितांचे रचनाकार बशीरभाई कमृद्दीन मोमीन कवठेकरांची असत.त्यांची हयात लोकगीते व वगनाट्ये लिहिण्यात व्यतीत झाली. पूर्वी जसे होनाजीने कवने करावीत व ती बाळा करंजकरांनी गायची असे समीकरण होते तसेच बशीरभाईंनी कवन करायचे व ते दत्ताजींनी गायचे असा पायंडाच पडला होता.पण बशीरभाईंची मात्र उपेक्षा झाली.कोठल्याही तमाशा मधे नेहमीच कलाकारांच्या जोड्या सवाल जबाबाने गाजत असत व त्या जोडीच्या नावानेच फड प्रसिद्ध व्हायचा.

दत्ता महाडिकांनाहि गुलाबराव बोरगावकर यांच्या सारखा जोडीदार मिळाला.गुलाब बोरगावकर यांचे मूळ नाव गुलाब मोहमंद जामदार. सांगली जिल्ह्यातील बोरगावच्या उनाडक्‍या करणाऱ्या गुलाबने सातव्या इयत्तेत शाळेला रामराम ठोकला.नाटक,भजन आणि तमाशामध्ये रमणाऱ्या या कलन्दर कलाकाराने लोकनाट्याकडे वाट वळविली व या प्रवासात त्यांची महाडिकांची गाठ पडली.महाडिकांचे व त्यांचे सूत जुळले व त्यांच्या फडात सामील झाले. तमाशा सृष्टीत गुलाबराव बोरगावकर आणि मास्टर दत्ता महाडिक ही जोडगोळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली व दोघांनी मिळून आपला फड काढला. मुळातच विनोदी स्वभावाला अनुसरून त्यांची प्रतिभा सवाल जबाब मधे आणखीन बहरत असे.

या जोडीने ढोलकी फडाच्या तमाशात सोंगाडयाची जोडगोळी म्हणून कारकीर्द गाजविली.या जोडीच्या सवाल-जबाबांनी. अक्षरशः महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.या दोघांनी मुंबईचा हमाल,गवळयाची रंभा,लडडू सिंग,सात पिढयाचं वैर,नायकिणीचा रंग महाल,इंदिरामठाचे गुपीत,शत्रुशी झुंजला बांगला, ज्ञानेश्‍वर माझी माऊली,संत तुकाराम,असे पुढारी ठार करा, लग्नाआधी कुंकू पुसले, मानवत खून खटला अशी अनेक विषयांना स्पर्श करणारी वगनाट्ये प्रेक्षकांना दिली.त्यांच्या सादरीकरणाची नोंद ठेवली असती तर ते एक रेकॉर्ड झाले असते.वगनाट्य सम्राटाला अभिवादन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)