#विविधा: जाणून घ्या ! ‘विनोदमूर्ती शरद तळवलकर’ यांच्याबद्दल

माधव विद्वांस

चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे नाट्यचित्र अभिनेते, कै शरद तळवलकर याचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1921रोजी नगरजिल्ह्यातील बोधेगावात झाला व निधन 21 ऑगस्ट2001 रोजी पुणे येथे झाले. त्यांचे शालेय शिक्षण पुणे येथेच झाले

विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु :खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर उमटत असत. शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी जास्त निगडित असले तरी त्यांना नाटक प्रिय होते. पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी’ नाटकातील शिशुपालाची भूमिका त्यांनी निभावून नेली व त्यांच्या अभिनयाचा पडदा उघडला .साष्टांग नमस्कार’ या नाटकातील भद्रायु भाटकर हे पात्रही याच विद्यार्थी दशेत रंगविले. अभिनयाच्या पदार्पणाच्या नाटकातील पात्रे त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कुल मधूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.

अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी मिलीटरी अकौंटस’मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते.केशवराव दात्यांच्या नाट्यविकास’मंडळीत त्यांनी करार पद्धतीने काम केले .

माझा मुलगा’या चित्रपटापासून विनोदी अभिनेता म्हणून त्यांना चित्रपटसृष्टीत स्थान मिळाले ते त्यांनी अखेर पर्यंत निभावले. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा विशेष ठसा उमटविला होता.एकच प्याला’तील रंगवलेली तळीरामाची भूमिकेने बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाच्या कौतुकास पात्र ठरले. “लग्नाची बेडी’ या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या खास शैलीत रंगविला.

नाट्यनिर्माते म्हणून पुणे आकाशवाणी केंद्रावर नभोनाट्यात त्यांनी केलेले काम सगळ्यांच्याच लक्षात राहिले. आमच्या लहानपणीच्या काळात नभोनाट्ये हे एक मोठे करमणुकीचे साधन होते. कलाकार’ ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली.
वास्तवाशी निगडीत असलेली मुंबईच्या चाळीतील जीवन दाखवणारी ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटातील त्यांनी केलेली भूमिका खूपच सुंदर होती .त्यांना नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे’ पुरस्काराने गौरविले गेले.
विनोदाच्या बादशहाला अभिवादन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)