विविधा: गुस्ताव्ह आयफेल

माधव विद्वांस

आयफेल टॉवरचे संकल्पचित्र व योजना कार्यान्वित करणारे अलेक्‍झांडर गुस्ताव्ह आयफेल ह्यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे निधन पॅरिस येथे 27 डिसेंबर 1923 रोजी झाले. त्यांचा जन्म फ्रान्समधील बुर्गण्डी प्रांतातील दिजोन शहरात 15 डिसेंबर 1832 रोजी झाला. ते रेल्वे आर्च ब्रीज बांधकाम तज्ज्ञ होते. तसेच निवृत्तीनंतर हवामान आणि वायुवेग याचाही त्यानी अभ्यास केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फ्रान्सच्या राज्यक्रांतीच्या स्मरणार्थ उभारण्याच्या स्मारकासाठी अनेक इंजिनिअर्स, वास्तुशास्त्रज्ञ यांच्याकडून निविदा मागविल्या होत्या. त्यात आयफेल यांची योजना मंजूर झाली. न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार करण्यामधेही त्याचे योगदान होते. ते फ्रान्समधील रेल्वेखात्यामध्ये अभियंता म्हणून हजर झाले. अनेक रेल्वे पुलांची कामे त्यांचे अधिपत्याखाली पार पडली गेली. 1868 मध्ये थिओफील सॅरिंग यांचेबरोबर भागीदारीत आपली बांधकाम कंपनी सुरू केली. बीओटी म्हणजे सध्या भारतात शासनामार्फत चालू असलेली विकासकामे बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर चालू आहेत. या प्रथेची सुरुवात आयफेल टॉवरचे कामापासून झाली.

फ्रान्स सरकारने अंदाजित 6.5 फ्रॅंक प्रकल्प किमतीपैकी फक्‍त 1.5 फ्रॅंक वाटा व जागा दिली. बाकी सर्व कंपनीने उभारून रोखे काढून खर्च भागविला. सर्व पुतळेप्रेमी जनतेने याचा आदर्श ठरवण्यास हरकत नाही. गुस्ताव्ह आयफेल यांनी फक्‍त आराखडाच तयार केला असे नाही तर त्यांनी निधी उभारण्यासाठी शासनाचे साहाय्याने कर्जरोखे काढणे तसेच बांधकाम व्यवस्थापनही केले. जसा प्रत्येक नवीन गोष्टीला आपल्याकडे जसा विरोध आणि टिंगल असते तशाच प्रकारचा विरोध फ्रान्समधेही या प्रकल्पाला झाला .आयफेल टॉवर आपल्या निवासी इमारतीच्या 81 मजल्या एवढा उंच (1,063 फूट, 324 मीटर) उंच आहे फ्रेंच क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ सुमारे 300 कामगारांनी 18,038 अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला.त्यासाठी 7300 टन लोखंडाचा वापर करण्यात आला.

आयफेल यांनी प्रकल्पाचा अंदाजित खर्च, पर्यटकांचेकडून मिळणारा परतावा, वित्तीय संस्थांना द्यावे लागणारे व्याज याच मेळ घालत प्रकल्पाचा नुसताच आरखडा नाहीतर जगातील एक आश्‍चर्य उभे केले. 2017 मध्ये 69 लक्ष पर्यटकांनी आयफेल टॉवरला भेट दिली यावरून त्याचे ऐतिहासिक व पर्यटन कळून येते. वास्तुशास्त्रज्ञास प्रणाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)