#विविधा : किशोरकुमार 

माधव विद्वांस 

पार्श्‍वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथालेखक, अशा बहुरंगी भूमिका वठविणारे चंदेरी दुनियेतील एकमेव व्यक्‍तिमत्त्व म्हणजे किशोरकुमार. आज किशोरकुमार याची जयंती. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी खांडवा येथे झाला. खांडवा येथील गोखले कुटुंबीयांनी कुंदजलाल गांगुली (वकील) यांना खांडवा येथे त्यांचे कायदा सल्लागार म्हणून आणले. तेथेच ते स्थायिक झाले. त्यांना अशोककुमार, सतीदेवी, अनुपकुमार व आभासकुमार (किशोरकुमार) अशी चार मुले झाली. त्यातील तिघे भाऊ रुपेरी पडद्यावर झळकले. किशोरदांची गाणी लोकप्रिय झाली. त्यांनी गायलेल्या गाण्यांची यादी देणेही अवघड आहे. त्यांनी सुमारे 400 हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“चलती का नाम गाडी’सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ‘दूर गगन की छॉंव में सारखे गंभीर चित्रपटही काढले. “शिकारी’मध्ये त्यांनी 1946 मध्ये पहिल्यांदा अभिनय केला तर 1948 मध्ये “जिद्दी’मध्ये देव आनंद यांचेसाठी आवाज देऊन पहिल्यांदा पार्श्‍वगायन केले. किशोरकुमार यांनी हिंदी सिनेमातील नायक देव आनंद, राजेश खन्ना व अमिताभ बच्चन या आघाडीच्या नायकांना आवाज दिला. बाराव्या वर्षीच गीत-संगीतामध्ये किशोरकुमार यांनी चुणूक दाखवली. रेडिओवरील गाणी ऐकून ते आपल्या ढंगातच थिरकत होते. त्यावेळी फिल्मी गीताच्या छोट्या पुस्तिका मिळायच्या.

त्या पाठ करून घेत असत. ते शिक्षणासाठी इंदूरला होते. त्यावेळी इंदूर-खांडवा रेल्वे प्रवासात गाणी गात प्रवाशांची करमणूक करीत असत. घरी आलेल्या पाहुण्यांच्यासमोर ते गाणी म्हणत व बक्षीसही मिळवत. एक दिवस अशोककुमार यांच्याकडे संगीतकार सचिन देव बर्मन आले होते. त्यावेळी त्यांना एका गाण्याची लकेर ऐकू आली. “हा कोणाचा आवाज’ असे त्यांनी विचारताच दादामुनी म्हणाले, माझा धाकटा भाऊ किशोर; गाणे गायल्याशिवाय त्याची आंघोळ पुरी होत नाही.’ सचिनदांना एक हिरा मिळाला त्यावर त्यांनी पैलू पडले व चंदेरी दुनियेत चमकता तारा बनविले. मुंबईतील ग्लॅमरस पार्ट्यात किशोरदा फारसे सामील होत नसत. ते म्हणायचे निवृत्तीनंतर खांडव्यात जाऊन दूध आणि जिलेबी खाईन. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा अंतिम संस्कार खांडवा येथे करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)