विविधा: कवी भा. रा. तांबे

माधव विद्वांस

आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक भा. रा. तांबे यांची आज जयंती. 27 ऑक्‍टोबर 1873 रोजी झाशीजवळच्या मुंगावलीमध्ये त्यांचा जन्म झाला. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ‘राजकवी’ होते. हिंदी भाषिक प्रदेशात राहूनही मराठीचा त्यांचा व्यासंग उत्तम होता. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांचाही त्यांनी अभ्यास केला होता. झाशी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. देवासच्या राजकुमाराचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती त्यासाठी इंदूर येथे राहावे लागले. तेथेच त्यांनी इंग्रजीचा अभ्यास केला. वास्तव्य केले. याच काळात त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. वर्ष 1897 मध्ये ते विवाहबद्ध झाले. ग्वाल्हेर येथे संस्थानाचे राजकवी म्हणून स्थायिक झाले. त्यामुळे राजकवी तांबे’ या नावानेही ते ओळखले जाऊ लागले. बालगीत व नाट्यगीत अशा प्रकारची काव्यही त्यांनी रचली. माणसाच्या जीवनातील अनेक टप्प्याचे, नात्यांचे, भावनांचे, प्रेम, विरक्ती, निखळ दर्शन घडविणारी त्याची काव्य गीते आजही लोकांचे ओठावर आहेत. त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1920 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांनी लिहिलेल्या 225 कविता आजही उपलब्ध आहेत. तर 22 गाण्याच्या ध्वनिमुद्रिकाही उपलब्ध आहेत. कवी वासुदेव गोविंद मायदेव यांनी त्यांच्या कविता 75 कविता संपादित केल्या तर डॉ. माधवराव पटवर्धनानी तांबे यांची समग्र कविता हे पुस्तक 1935 मध्ये प्रकाशित केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टी सारखी धरी या मालकंस रागातील गाण्यातून आई व बाळाचे नाते दाखविले तर तुझ्या गळां, माझ्या गळांगुंफू मोत्यांच्या माळा या भीमपलास रागातील गाण्यातून भाव बहिणीचा संवादही घडविला. “डोळे हे जुलमि गडे रोखुनि मज पाहु नका’ या मिश्र मारूविहाग रागातील गीतातून प्रेमभावनाही व्यक्त केल्या. “जन पळभर म्हणतील, हाय हाय’ मी जाता राहिलं कार्य काय? या मल्हार रागातील गाण्यातून जगरहाटीचे सुरेख वर्णन केले आहे. नववधू प्रिया, मी बावरते लाजते, पुढे सरते, फिरते…’ या भावगीतातून नवपरिणीत वधूच्या मनातील खळबळही सुंदरतेने मंडळी आहे. “तिन्ही सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला’ हे मिश्र यमन रागातील गाणे तसेच “रे हिंद बांधवा थांब या स्थळी’ हे देशभक्तीपर झाशीचे राणीवरील सुंदर गीतही त्यांनी लिहिले.

भा. रा. तांबे यांचे मुलाचे (डॉ र. भा. तांबे, रेल्वे डॉक्‍टर) यांच्या घरी भावनगर येथे मला 1962 साली जाण्याचा योग आला होता. कविवर्य तांबे यांचे तैलचित्र पाहून यांचा फोटो तुमचेकडे कसा? या प्रश्‍नावर ते माझे वडील असे ऐकताच मला खूप आनंद झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)