#विविधा: कवी इक्‍बाल मोहंमद 

माधव विद्वांस 
“इक्‍बाल तुमचे गाणे सर्व हिंदुस्थानी लोकांच्या हृदयात आहे, पण तुम्ही मात्र पाकिस्तान निर्मितीची मागणी करून पाकिस्तान भारत निर्मितीचे अगोदरच भारतीय म्हणूनच इहलोक सोडून गेलात.’
बॅरिस्टर सर इक्‍बाल मोहंमद यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे जन्म 9 ऑक्‍टोबर 1877 रोजी झाला.त्यांचे पूर्वज सप्रू घराण्यातील काश्‍मिरी पंडित होते. ते अत्यंत हुशार होते लाहोर विद्यापीठात त्यांनी पहिला क्रमांक मिळविला होता. 1905 साली त्यांनी सारे जहॉं से अच्छा हे राष्ट्रगान लिहिले. त्यांना उर्दू ,पर्शियन आणि इराणी भाषा अवगत होत्या. असरार-ए-खुदी हा त्यांचा पहिला पर्शियन कवितासंग्रह तर बाग-ए-दारा हा पहिला उर्दू कवितासंग्रह, लाला हरदयाळ यांनी त्यांना एका कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलाविले होते त्यावेळी त्यांनी भाषण करण्याऐवजी “सारे जहॉं से अच्छा’ ह कविता ऐकविली.
मात्र, 25 वर्षात पुलाखालून पाणी वाहून गेले आणि 29 डिसेंबर 1930 चे अलाहाबाद येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात त्यांनी मुस्लीम राष्ट्राची मागणी मांडली. त्यावेळी पाकिस्तान ही कल्पना नव्हती. तर उत्तर पूर्व इस्लामी राज्याची त्यांची मागणी होती. अर्थात, आताचे पाकिस्तानचे क्षेत्रच त्यांना अभिप्रेत होते. काही झाले तरी त्यावेळच्या मुस्लिमांना हिंदुस्थान या शब्दाचे आकर्षण असे, अगदी सर्व मुघल सम्राटांचे दरबारात बादशहाचे आगमनाचे वेळी “शहेनशहा-ए-हिंदोस्तान!” अशी ललकारी दिली जायची. तसेच यांच्या कवितेत हिंदुस्थानचा उल्लेख त्याच भावनेतून आला. कवी कवितेत खोटे सांगत नाही त्याच्या मनातील उर्मी त्यात ध्वनित होत असते. हेच या गाण्याच्या बाबतीत झाले. 1905 ते 1930 या कालावधीत त्याचा मुस्लीम लीगशी संबंध आला. मुस्लीम राष्ट्राची मागणी त्यांनीच प्रथम जाहीरपणे मांडली व जिनांना लीग मध्ये येण्याचे आमंत्रणही त्यांनी दिले. जिनांनी त्यांना मार्गदर्शक मानले व त्यांची मुस्लीम राष्ट्र निर्मितीची इच्छा पूर्ण केली. त्यांना पाकिस्तानचे राष्ट्रकवी मानण्यात येते. तसेच अलामा इक़बाल (विद्वान इक़बाल) शायर-ए-मशरीक़ (पूरब का शायर) या उपाध्या पाकिस्तानात देण्यात आल्या. त्यांचे 21 एप्रिल 1938 रोजी निधन झाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)