विविधा: अनंत फंदी 

माधव विद्वांस 
शाहीर अनंत फंदी यांचे हे स्मृतिदिनाचे द्विशताब्दी वर्ष आहे. त्यांचे निधन 3 नोव्हेंबर 1819 रोजी झाले. हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे होते. त्यांचे स्मरणार्थ संगमनेर येथे दरवर्षी अनंत फंदी व्याख्यानमाला होत असते. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नकोहा फटका वाचून शालेय जीवनाची नक्कीच आठवण होईल. पूर्वी शाळेत असताना शिकवला जायचा. अलीकडच्या पाठ्यपुस्तकांत त्याचा समावेश आहे किंवा नाही हे माहीत नाही. शाहीर साबळे हा फटका कार्यक्रमातून सादर करीत असत. पण फटका या प्रकाराचे जनक शाहीर अनंत फंदी होते, त्यातून ते उपदेश करीत असत. त्यांच्या रचना पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची पण रसाळ व प्रासादिक होती.
उत्तर पेशवाईत शाहिरी बहरली होती.राम जोशी, होनाजी बाळा, शाहीर परशुराम असे प्रतिभावंत शाहीर होऊन गेले. अनंत फंदी हे पण त्यांच्या समकालीन होते. त्यांचे मूळ नाव घोलप असे होते. ते ब्राह्मण असूनही गोंधळी व्यवसाय करायचे (शुभ कार्यातील समाप्तीचा कार्यक्रम) त्यांचे वडील कीर्तनही करीत असत. त्यांना फंदी नाव कसे पडले याची गमतीशीर गोष्ट सांगितली जाते. पूर्वी मलक नावाचा फकीर संगमनेरमध्ये राहात असे, त्याचे वागणे चमत्कारिक असल्याने त्याला लोक फंदी म्हणायचे. अनंत घोलप हे त्यांचे मित्र झाले होते म्हणून त्यांनाही लोक अनंत फंदी म्हणू लागले.
अनंत फंदींच्या आईचे नाव राऊबाई आणि पत्नीचे म्हाळसाबई. अनंत फंदींचे पूर्वज गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा करीत असत. अनंत फंदींनी अनेक लावण्या केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या तीन मित्रांना घेऊन तमाशा फड काढला होता. एकाचे नाव मलकफंदी, दुसऱ्यांचे रतनफंदी, तिसऱ्याचे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी. हे चौघेही इंदूरपर्यंत होळकरशाहीत तमाशा सादर करण्यासाठी गेले होते. एकदा शंकराचार्यांची त्यांची गाठ पडली त्यावेळी शंकाराचार्यांनी संध्येतील 24 नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगितली जाते. उतारवयात अहिल्याबाई होळकर यांचे सांगण्यावरून ते कीर्तन करू लागले, त्यांनी श्रीमाधवनिधन ग्रंथ हे ओवीबद्ध काव्य लिहिले. या काव्याचे सहा अध्याय उपलब्ध आहेत. फंदी अनंतकवनांचा सागर आणि समोर गातां कोणि टिकेना’असे शाहीर होनाजी बाळा यांनीही त्याच्या कवनात म्हटले आहे. शाहिरांना अभिवादन.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)