विवाहित महिलेचा विनयभंग

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील बस स्थानकावर एसटी बसमध्ये बसलेल्या एका महिलेचा विनयभंग केला. मंगळवारी (दि. 20) सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

किरण नामदेव थोरात (रा. कळंब, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्या आरोपी नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 28 वर्षीय पीडित महिला सायंकाळी सहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे बस स्थानकावरून गावी जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसली. त्यावेळी आरोपी थोरात हा महिलेच्या मागील सीटवर बसला. सुरुवातीला त्याने मागच्या सीटवरून महिलेच्या पायाला लाथा मारल्या. त्यानंतर त्याने महिलेच्या शरीराला हात लावून महिलेचा विनयभंग केला.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)