विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास अटक

लोणीकाळभोर पोलीसांकडून तातडीने कारवाई

लोणी काळभोर- पतीपासून दूर रहात असलेल्या विवाहित महिलेस मला तु आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण लग्न करू, असे सांगून वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून लग्न करण्यास नकार देऊन शिवीगाळ करुन विवाहितेस जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला लोणी काळभोर पोलीसांनी अटक केली आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन अमोल काशिनाथ सोनकांबळे (वय 30, रा. नांदुरगा, ता. औसा, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मुळ गाव दुसऱ्या जिल्ह्यातील असलेल्या 36 वर्षीय महिलेचा पती कामानिमित्त बाहेरगावी असतो. सदर महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. काही दिवसांपुर्वी शेजारी राहणाऱ्यांकडे पाहुणा म्हणून अमोल सोनकांबळे आला. त्याने पिडीत महिलेशी ओळख वाढवून तु एकटी किती दिवस राहणार. माझ्या सोबत रहा. मी तुला घर बांधून देतो, असे म्हणत जवळीक साधली. अधूनमधून तो तिला भेटण्यासाठी येत होता, त्यातून दोघांची चांगली ओळख झाली होती. दि. 24 एप्रिलला विवाहितीने राहते घर बदलले होते, तेथेही अमोल सोनकांबळे आला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आठवड्यातून एक, दोन वेळा येऊन लग्नाचे अमिष दाखवून तो शारीरिक संबंध ठेवत होता. दि. 15 नोव्हेंबरला सकाळी 6:00च्या सुमारास अमोल नेहमीप्रमाणे तिच्या घरी आला. त्यावेळी महिलेने त्याला लग्न केंव्हा करणार, अशी विचारणा केली. त्यावेळी सोनकांबळे याने तुझ्याशी लग्न करणार नाही. कोणास काही सांगितले तर जिवंत सोडणार नाही. मोबाईल वरील चित्रीकरण सर्वांना दाखविल, अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाली असल्याचे विवाहितेला लक्षात आले. ही बाब तिने पती व बहिणीच्या मुलाला सांगितली. दि. 18 नोव्हेंबरला रात्री 9:30च्या सुमारास सोनकांबळे पुन्हा विवाहितेच्या घरी आला. शिवीगाळ, दमदाटी करून निघून गेला. पती आल्यानंतर तिने सदर प्रकार सांगितला. त्यानुसार आज, पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलीसांनी अमोल सोनकांबळे याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)