विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कोपरगाव – तालुक्‍यातील संवत्सर येथील विवाहिता शितल योगेश भाकरे (वय 21) हिस माहेरून घर बांधण्यासाठी चार लाख रूपये आणावेत म्हणून तिचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, चंद्रकांत उर्फ बाळासाहेब नानासाहेब भाकरे, भिमबाई उर्फ लता बाळासाहेब भाकरे, चेतन उर्फ योगेश बाळासाहेब भाकरे, गिता गणेश भाकरे, पोपट नानासाहेब भाकरे, सचिन कारभारी भाकरे (सर्व रा. भाकरे वस्ती, संवत्सर) यांनी शितल हिने माहेरून घर बांधण्यासाठी चार लाख रूपये आणावे यासाठी तिला मारहाण करून तिचा शारिरीक व मानसिक छळ केला, या त्रासातून शितल हिने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी शितलचे वडील भास्कर जगन्नाथ झिंजुर्डे (रा.महालगांव, वैजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)