विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी चौघांना सक्तमजुरी

पुणे – विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केलाप्रकरणी पती, सासूसह चौघांना 5 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम.एन.सलीम यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिने कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

पती चैतन्य उर्फ ओमय मनोज खोपकर (वय 23), सासू नंदा मनोज खोपकर (वय 45), आजेसासू ताराबाई मोती चव्हाण (वय 80) आणि मावस सासू सुरेखा उर्फ बिल्लो अरुण वाडीया (सर्वजण रा. कॅन्टोन्मेंट चाळ, लष्कर) अशी शिक्षा झालेला चौघांची नावे आहेत. ज्योती चैतन्य उर्फ ओमय खोपकर (वय 22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गळफास घेऊन तिने आत्महत्या केली होती. ज्योती हिचा भाऊ सुरेश घावरे (रा. कोल्हापूर) याने याबाबत फिर्याद केली होती. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी 9 साक्षीदार तपासले. विशेष म्हणजे लग्न जमविणारे आणि पंच फितूर झालेले असतानाही न्यायालयाने ही शिक्षा दिली. माहेरहून सोनसाखळी आणि अंगठी आणावी यासाठी फेब्रुवारी 2012 पासून ज्योती यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. त्या त्रासाला कंटाळून ज्योती यांनी ऑक्‍टोबर 2013 मध्ये आत्महत्या केली. त्यावेळी ज्योती यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये आरोपींच्या नावाचा उल्लेख होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)