विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे ः पाच लाख रुपये आणि चारचाकी वाहन आणण्यासाठी शारीरिक, मानसिक छळ करून विवाहितेला आत्महत्या करण्यास भाग पाडलेल्या पतीला अटक करण्यात आली आहे. रुकसाना इनामुल हक (28) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मोहंमद अन्सारी (वय 54,रा.झारखंड) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी इनामुल नईमुल हक (वय 34,रा.कुबेरा पार्क सोसायटी, कोंढवा) याला अटक केली असून अन्य दोघांना अद्याप अटक केलेली नाही. 2016 मार्च ते 11 जून 2018 पर्यंत बंगलोर, गोविंदपूर, झारखंड, कुबेरा पार्क येथे मयत विवाहितेचा छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)