विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासऱ्यास सक्‍तमजुरी

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासऱ्यास सक्‍तमजुरी
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 16 – विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासऱ्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली. स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी जून 2016 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. सुनील मनोहर परदेशी असे आरोपीचे नाव आहे.
भारती ललीत परदेशी (25, रा. पर्वती पायथा, स्वारगेट) या महिलेने 21 जून 2016 रोजी अंगावर रॉकेल आतून घेऊन आत्महत्या केली होती. यामध्ये ती 75 टक्के भाजली होती. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना तिने कोणाविरोधात तक्रार दिली नव्हती. तिच्यावर उपचार सुरू असताना 28 जून रोजी मयत झाली. तिचा मृत्यू झाल्यावर तिच्या आईने सासू-सासरे छळ करत असल्याची तसेच सासऱ्याची वाईट नजर असल्याची तक्रार दाखल केली होती. याचा तपास करताना पोलिसांना तिच्या पतीचे हे दुसरे लग्न असून पहिली पत्नी सासू व सासरे त्रास देत असल्याने सोडचिठ्ठी देवून निघून गेल्याचा पुरावा आढळला. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून महत्त्वाचे साक्षिदार मिळवले. त्यानुसार सासऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सत्र न्यायाधिश एस. जी. घरत यांनी आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी व 2 वर्षे सक्तमजूरी ही शिक्षा ठोठावली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)