विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीला पोलीस कोठडी

पुणे – विवाहितेचा शाररिक आणि मानसिक छळ करून तिला विष प्राषण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पतीला अटक केली. न्यायालयाने त्याला 1 ऑक्‍टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आकाश देवा पांडीयन (रा. गुलमोहर अपार्टमेंट, शिवनेरी नगर, कोंढवा) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत रिबेका देवेंद्र पिल्ले (47, रा. खडकी बाजार) यांनी फिर्याद दिली आहे. दि. 6 जुलै 2018 ते 26 सप्टेंबर 2018 दरम्यान हा प्रकार घडला. मनाली आकाश पांडीयन यांनी आत्महत्या केली. पती आकाश आणि सासू यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी सहायक सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी पोलीस कोठडीची मागणी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)