विवाहितेच्या आत्महत्या; पतीसह पाच जणांना बेड्या

भवानीनगर- अनैक संबंध, खोट्याचा चोरीच्या आळ घेऊन पती, सासू, सासरे, दोन नंदांकडून वारंवार होणाऱ्या शारिरीक व मानसिक त्रासला कंटाळून काटेवाडी (ता. बारामती) येथील एका विवाहितेने शनिवारी (दि. 4) आत्महत्या केली आहे. तर बारामती ग्रामीण पोलिसांनी आज (रविवारी) पतीसह पाच जणांना अटक केली आहे.
गौरी उर्फ ऋतुजा गणेश कांबळे (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती गणेश बन्सिलाल कांबळे, सासरे बन्सिलाल कांबळे, सासू अलका कांबळे, नणंद स्वाती खंडाळे, पूजा ढावरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर मृत गौरीचा भाऊ अजय भिसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती की, गौरी कांबळे हिचे लग्न 4 डिसेंबर 2007 रोजी पुण्यातील गणेश बन्सिलाल कांबळे याचेसोबत करण्यात आले. लग्न झाल्यानंतर दोन महिन्यानंतर अनैतिक संबंधांबाबत संशय घेऊन पती, सासू, सासरे दोन नंदा तिला वारंवार शरिरीक व मानसिक त्रास देत होते. तसेच तिच्यावर सोने चोरीचा खोटा आळ टाकून त्रास देत होते. तसेच हे माहेरच्यांना सांगितले तर आई, वडील भावाला जीवे मारू आशी धमकी देत होते. त्याबाबत गौरीने याबाबत माहेरच्यांना चार-पाचवेळा सांगितले होते; परंतु तिची समजूत काढून तिला सासरी पुणे तेथे परत पाठविले होते. तरी हा त्रास न थांबल्याने अखेरीस गौरीने शनिवारी (दि. 4) वडिलांच्या राहत्या घरी दुपारी चारच्या सुमारास छताच्या ऍगलला गळफास घेऊन आत्महत्या केली असून या त्रासाबाबत तिने लिहिलेली चिठ्ठी तिच्या ड्रेसमध्ये आढून आल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)