विवाहितेची आत्महत्या

सासु सासऱ्यांवर गुन्हा दाखल
नागठाणे (वार्ताहर)
लिंबाचीवाडी ता.सातारा येथील सुवर्णा शिंदे हिने रहात्या घरी साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सासु,सासऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
नातवाच्या आजारपणाला व नवीन घराच्या बांधकामासाठी झालेला खर्च माहेरवरून आणावा यासाठी सासू-सासऱ्यांनी वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून मुलगी सुवर्णा उर्फ सोनम शिंदे हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद कैलास नाथा माने (रा.धकटवाडी, ता.खटाव) यांनी बुधवारी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिसांनी सासरा आनंदराव नारायण शिंदे ( रा.लिंबाचीवाडी, ता.सातारा) व सासू सौ. बबई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी सकाळी लिंबाचीवाडी येथील सौ.सुवर्णा उर्फ सोनम कृष्णत शिंदे यांनी त्यांच्या राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती माहेरच्या मंडळींना कळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.यावेळी मुलीचे वडील कैलास नाथा माने यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात सासू सौ.बबई व सासरा आनंदराव शिंदे यांनी वेळोवेळी नातू श्रेयस याच्या जन्मावेळी हॉस्पिटलचा झालेला खर्च व नवीन घर बांधकामासाठी माहेरहून आणावेत यासाठी शाररिक व मानसिक छळ करत होते.या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या दोघांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.ए. खान करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)