विवाहितेचा छळ 7 जणांवर गुन्हा

पिंपरी – घरगुती कारणावरुन व माहेराहून पैसे आणावेत यासाठी सतत महिलेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये महिलेचा पती अमित बाबूराव राणे, सासरे बाबूराव सुका राणे, सासू नलिनी बाबूराव राणे यांच्यासह चारुशीला महाजन, अमित महाजन (सर्व रा. लोंढा पॅरेडाईज, माजी वाडा, ठाणे), तेजस्विनी कोल्हे, मिलिंद कोल्हे (रा. अहमदाबाद) यांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुजाता अमित राणे (वय-32, रा. नखाते वस्ती, काळेवाडी) या विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 20 मे ते 29 जून 2018 दरम्यान सासरी असताना माहेर वरुन पैसे आणावेत अशी मागणी केली तसेच मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)