विवाहितेचा छळ ; 5 जणांवर गुन्हा

पिंपरी – लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दापोडी येथे घडली.

पती कुणाल कमलाकर क्षीरसागर (वय-32), सासरे कमलाकर गंगाधर क्षीरसागर (वय-55), सासू विनोदीनी क्षीरसागर (वय-50), दीर विशाल क्षीरसागर (वय-28), नणंद करिष्मा धीरज चौरे (वय-27, सर्व रा. गणेशनगर, दापोडी) अशी आरोपींची नावे आहेत. तर याप्रकरणी केतकी क्षीरसागर (वय-27) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे 2015 ते 3 जानेवारी 2019 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून लग्नात मानपान केला नाही. तसेच स्वयंपाक नीट येत नाही. नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून 11 लाख रुपये आणावेत या कारणासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. सहायक निरीक्षक गणेश खारगे अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)