विवाहितेचा छळ ; सहा जणांवर गुन्हा

पिंपरी – घरगुती कारणावरुन विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली.

साक्षी उर्फ ज्योती प्रशांत शिरसाट (वय-26, रा. रंभा अपार्टमेंट, मोरया पार्क, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत सुरेश शिरसाट आणि इतर पाचजण अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घरगुती कारणावरुन आपला वारंवार मानसिक व शारिरीक छळ केला जात असल्याचे साक्षी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 20 फेब्रुवारी 2018 ते 8 जून 2018 या कालावधीत ही घटना घडली. सहायक निरीक्षक बलभीम ननवरे अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)