विवाहितीचा छळ करणाऱ्या पती, सासू आणि सासऱ्याला कारावास

पतीला दोन वर्षे सक्तमजुरी


तर, सासू-सासऱ्यांना 1 वर्षाचा साधा कारावास


प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.बी.पाटील यांचा आदेश

पुणे – हुंड्यासाठी विवाहितेचा शाररिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीसह पीडितेच्या सासू-सासऱ्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पतीला दोन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार दंड, तर त्यांच्या आई-वडीलांना एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. पाटील यांनी हा आदेश दिला आहे. दंडाची रक्कम विवाहितेला देण्याचेही आदेश न्यायालयाने यावेळी दिले.
पती शिरीष उध्दव कदम (41), सासू राजुबाई उध्दव कदम (57) सासरे उध्दव हरिभाई कदम (67, तिघेही रा. बालाजीनगर, पुणे) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. तर, नणंद शशिकला देवीदास गायकवाड (32, रा. दिल्ली) यांची न्यायालयाने पुराव्या आभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबत पीडित विवाहिता पुनम शिरीष कदम (28, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अनंत बा. चौधरी यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. त्यांना कोर्टकामी पोलीस शिपाई यु. आर. दाभेकर आणि पोलीस हवालदार एम. बी. शिंदे यांनी मदत केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शितल शशिकांत सुतार यांनी केला.
2005 साली पुनमच्या घरच्यांनी थाटामाटात त्यांचा विवाह लावून दिला. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सासरच्यांकडून त्यांचा शारीरिक, मानसीक छळ सुरू झाला. पती दारू पिऊन हुंड्यासाठी भांडण करू लागला. तु आल्याने दरिद्री लागली म्हणून त्यांना टोमणे मारले जावू लागले. दोन मुले झाल्यानंतरही पुनम यांचा छळ काही कमी झाला नाही. माहेरहून 50 हजार रूपये आणून देऊनही सासरच्या मंडळींच्या वागण्यात कोणताच फरक पडला नाही. उलट सासरच्यांनी त्यांना सलग चार दिवस मारहाण केली. त्यांच्या दागिण्यांचाही अपहार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. खटल्यात सरकारी वकील ऍड. चौधरी यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तिघांना शिक्षा सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
38 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)