विवाहिता विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

चाफळ – चाफळ विभागातील वाघजाईवाडी, ता. पाटण येथील 27 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर बाबुराव सुर्ले रा. वाघजाईवाडी असे गुन्हा नोंद करुन अटक केलेल्या सदस्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार, दि. 7 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पीडित विवाहित महिला कामानिमित्त रानात गेली होती. त्यावेळी पाठीमागून बैले घेवून रानात आलेल्या जालींदर सुर्ले याने लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विवाहितेचा विनयभंग केला. पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन जालींदर सुर्ले याच्यावर उंब्रज पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अधिक तपास हवालदार व्ही. बी. भोसले करीत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)