विवाहातील खर्च टाळून रुग्णालयास मदत

मंचर- उद्योजक गोविंद खिलारी यांनी आपल्या मुलाच्या विवाह समारंभात अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मंचर उपजिल्हा रुग्णालयास 50 हजार रुपयांची वॉशिंग मशीन शुक्रवारी (दि. 11) भेट दिली आहे. गोविंद खिलारी यांच्या दातृत्वाचे मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सिमा देशमुख यांनी कौतुक केले आहे. खिलारी यांच्या मुलाचा विवाह नुकताच मंचर येथील जीवन मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मानापानाचा खर्च टाळुन मंचर उपजिल्हा रुग्णालयास साहित्य किंवा वस्तूंची मदत करावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार रुग्णालयास वॉशिंग मशीन देण्यात आली आहे. यावेळी स्वप्नील गोविंद खिलारी, डॉ. अंबादास देवमाने, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डी. के. वळसे पाटील यांच्यासह वैद्यकीय तज्ञ, कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)