विवाहाच्या विषयावर तब्बू रागावते

“चांदनीबार’ आणि “माचिस’सारख्या सिनेमांमधील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या तब्बूला विवाहाचा विषय काढलेले अजिबातच आवडेनासे झाले आहे. जर तिच्यासमोर कोणी हा विषय काढला किंवा “तू अद्याप लग्न का केले नाहीस’ असे विचारले की तब्बूला राग अनावर व्हायला लागले आहे. तिला तिच्या खासगी आयुष्याबद्दल कोणी जर विचारले तरी तिला राग येतो. इतके दिवस कोठे होतीस ? सध्या इतके कमी सिनेमे का करते आहेस ? लग्न कधी करणार आहेस ? असल्या प्रश्‍नांचा तिला तिटकारा यायला लागला आहे.

आता वय वाढल्यामुळे लग्नाचा विषय फारसे कोणी विचारत नाही. तिने सिंगल राहणे आता बहुतेकांना माहित झाले आहे. पण तरिही करिअरबाबत खोचक प्रश्‍न विचारणाऱ्यांचा तिला राग येतोच. जोपर्यंत एखादी कथा किंवा रोल आपल्याला पूर्ण अपील होत नाही, तोपर्यंत होकारच द्यायचा नाही, असे तब्बूने ठरवून टाकले आहे. यासाठीच प्रत्येक सिनेमाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी ती बराच वेळ घेते. सविस्तर कथा वाचते. बॅनर, सहकलाकार, डायरेक्‍टर कोण कोण आहे, याची सविस्तर माहिती घेते. मगच पुढचा विचार करते. त्यामुळेच तिने केलेले सिनेमे फ्लॉप होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)