विवाहाचा सल्ला दिल्याने मित्राच्या आईवर कुऱ्हाडीने वार

पुणे – विवाहाचा सल्ला दिल्याने मित्राच्या आईवर एकाने कुऱ्हाडीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खराडी येथील यशवंतनगर येथे घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल सावळाशंकर रासकर (वय-30, रा. वृंदावन सोसायटी, खराडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर, या घटनेत रमा सदाशिव धावनपल्ली (वय-48) या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी सदाशिव धावनपल्ली (वय-54, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिर्यादी यांचा मुलगा राकेश व आरोपी अतुल रासकर हे दोघेही मित्र आहेत. फिर्यादीचा मुलगा राकेशचा विवाह ठरल्याने फिर्यादी व त्यांची पत्नी रमा हे दोघेही आरोपी अतुलच्या घरी विवाहाच्या पत्रिका देण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी आरोपीला विवाह का करत नाहीस? लवकर विवाह कर, असे समजावून सांगितले होते. याचा राग मनात धरून आरोपी अतुल हा सोमवारी फिर्यादीच्या घरी आला होता. तेव्हा फिर्यादीची पत्नी रमा या एकट्याच घरी होत्या. आरोपीने त्यांना पाणी मागितले, त्या पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेल्या. तेव्हा आरोपीही त्यांच्या पाठोपाठ किचनमध्ये गेला. त्याने अचानक रमा यांच्या डोक्‍यात कुऱ्हाडीने जबर मारहाण केली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आरडा-ओरडा केल्यावर आरोपी पळून गेला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सोडनवर करत आहेत.

आरोपी आहे सुशिक्षत
आरोपीने बी.कॉम पर्यंतचे शिक्षण घेतले असून तो एमबीए करत आहे. सध्या तो बेरोजगार असून त्याचे वय 30 वर्षे झाले आहे. यामुळे एक वडिलकीच्या नात्याने त्याला विवाह करण्याचा सल्ला देण्यात आला होता. याचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)