विवाद बाजूला ठेवत महत्त्वपूर्ण विषयांवर हिंदी-चिनी भाई-भाईचे संकेत

बीजिंग (चीन) – चीन आणि भारत यांचे संबंध गेली अनेक वर्षे तणावाचेच आहेत. डोकलाम आणि अरुणाचल प्रदेश अशा मुद्यांवर तर हे मतभेद विवादापर्यंत वाढलेले आहेत. परंतु तरीही सतत विवादात गुंतलेली ही दोन शत्रुराष्ट्रे काही महत्त्वपूर्ण मुद्यांवर परस्पर सहकार्याच्या भूमिकेवर येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हिंदी-चिनी भाई-भाई नाते जुळण्याची लक्षणे दिसत आहेत.

भारत आणि चीन ही लोकसंख्या आणि अनेक गोष्टींमध्ये जगातील दोन सर्वात मोठी राष्ट्रे आहेत. जगातील तेलवापरापैकी सुमारे 17 टक्के वाटा भारत आणि चीन वापरतात. त्यामुळे दोघांनी मिळून पश्‍चिम एशियातील तेल उत्पादक देशांकडून तेलखरेदी करताना एकत्रितपणे सौदेबाजी करून किफायतशीर दरात तेलखरेदी करण्याच्या शक्‍यतेवर विचार होऊ लागला आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि चायना पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष वॉंग यिलीन आणि इतर अधिकाऱ्यांच्या बैठकीत या संबंधी चर्चा होऊन यासंबंधी निर्णय घेण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)