विवादित रामजन्मभूमी परिसरात नमाज अनुमती मागणारास न्यायालयाचा 5 लाख रु.दंड 

लखनौ, (उत्तर प्रदेश) – विवादित रामजन्मभूमी परिसरात नमाज अनुमती मागणारास न्यायालयाने 5 लाख रु.दंड सुनावला आहे. लखनौ उच्च न्यायालयात विवादित रामजन्मभूमी परिसरात नमाज अदा करण्यासाठी अनुमती मागणारी एक याचिका दाखल करण्यात आली होती. लखनौ खंडपीठाने ती याचिका निकाली काढली आणि अशी अपव्यय करणारी याचिका दाखल करण्याबद्दल याचिकाकर्त्याला पाच लाख रुपये दंड ठोठावला आहे.

रायबरेलीच्या अल-रहमान चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी शरीफ यांनी लखनौ उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. दिवाणी न्यायालयाने ज्या भागावर मुस्लिम पक्षाचा हक्क मानला होता त्या भागात नमाज अदा करण्याची याचिकेत अनुमती मागितली होती. कोणत्याही कायदेशीर आधाराविना केवळ सवंग प्रसिद्धीसाठी याचिका दाखल केल्याबद्दल न्यायमूर्ती डी के अरोरा आणि न्यायमूर्ती आलोक माथूर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला पाच लाख रुपये दंड ठोठावला. याचिकाकर्त्याने दंडाची रक्कम जमा न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्या वसुलीचे आदेश दिले आहेत. दिवाणी वादातील निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाने तत्काल जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)