विवस्त्र बंदुकधाऱ्याकडून झालेल्या गोळीबारात 3 ठार

वॉशिंग्टन – अमेरिकेतील तेन्नेएस्सी भागातल्या नाशविलच्या जवळ एका रेस्टॉरंटमध्ये पहाटेच्या सुमारास एका विवस्त्र बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळीबारामध्ये तिघेजण ठार झाले तर किमान चौघेजण जखमी झाले. नाशविल शहराच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या उपनगरात रात्री 3 वाजून 25 मिनिटांनी ही घटना घडली. रेस्टॉरंटच्या रखवालदाराने हल्लेखोराकडून रायफल हिसकावून घेतली तेंव्हा हा हल्लेखोर पळून गेला. हल्ला करणारा बारिक केस असलेला हा एक श्‍वेतवर्णीय होता आणि या हल्लेखोराने कोणतेही कपडे घातलेले नव्हते, असे पोलिसांच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

या वर्णनाचा व्यक्‍ती जवळच्याच उपनगरामध्ये बघितला गेला होता. या व्यक्तीचे नाव आणि रहाण्याचे ठिकाणही पोलिसांना समजले आहे. हा 28 वर्षांचा युवक असून त्याच्याकडे एआर- 15 बनावटीची रायफल असल्याचेही आढळून आले होते. या बनावटीच्या रायफलने गेल्यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये लास वेगासमध्ये 58 जणांचा बळी घेतला होता. तर फ्लोरिडामधील शाळेत झालेल्या गोळीबारातही अशीच रायफल वापरली गेली होती. या गोळीबारात विद्यार्थी आणि शिक्षक मिळून 17 जण मारले गेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)