विळीने गळा चिरुन आत्महत्या

पिंपरी – बिजलीनगर येथे 34 वर्षीय इसमाने राहत्या घरात भाजी चिरायच्या विळीने गळा चिरून आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 15) पहाटे चारच्या सुमारास घडली.

दत्तात्रय शिवाजी पाचकवडे (वय-34, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे मयत इसमाचे नाव असून याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली दत्तात्रय पाचकवडे (वय-30) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचवडे यांनी गुरुवारी राहत्या घरी पहाटे चारच्या सुमारास विळीने स्वतःचा गळा कापून घेतला. पत्नीला जाग येताच हा सारा प्रकार उघडकीस आला. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले व पुढे वायसीएम रुग्णालयात दाखल केले. सकाळी पावणे अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)