विल्यम्स आणि केट दाम्पत्याला तिसरे अपत्य

लंडन – ब्रिटनच्या राजघराण्यातील राजपुत्र विल्यम्स आणि केट मिडल्टन या दाम्पत्याला आज तिसरे अपत्य झाले. केट आणि विल्यम्स दाम्पत्याला पुत्ररत्न लाभले आहे आणि ब्रिटीश राजघराण्याला सलग पाचवा वारस लाभला आहे, असे आज किंग्जस्टन राजवाड्यातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

रात्रीच्या सुमारास केट मिडल्टन यांना प्रसुतीकळा जाणवू लागल्या होत्या. त्यांना पूर्वीच लंडनमधील सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याच हॉस्पिटलमध्ये विल्यम्स आणि केट यांची पहिली दोन अपत्ये जॉर्ज 2013 साली आणि कॅरोलेटचा जन्म 2015 साली झाला होता. केट यांना मध्यरात्रीच्या सुमारास प्रसुती होऊन मुलाचा जन्म झाला. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचेही या निवेदनामध्ये म्हटले आहे.

युवराज चार्ल्स, त्यांचे पुत्र विल्यम्स आणि विल्यम्स यांची दोन अपत्ये प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस कॅरोलेट यांच्यापाठोपाठ आता राजघराण्याला लाभलेला हा पाचवा वारस असेल. त्यामुळे सहाजिकच चार्ल्स यांचे बंधू हॅरिस हे वारसा हक्काच्या बाबत सहाव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)