विलास जाधव यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

कोळपेवाडी – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील माजी विद्यार्थी विलास सूर्यभान जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत 61 व्या नंबरने उत्तीर्ण होऊन त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नुकतीच निवड झाली आहे.
त्याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे वतीने संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांनी संस्थेचे व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे मानद सचिव चैतार्ली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विलास सूर्यभान जाधव यांचा सत्कार केला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना विलास जाधव म्हणाले की, मी ग्रामीण भागात राहून बारावीपर्यंतचे शिक्षण कला शाखेतून घेतले. सुशिला काळे कला ,वाणिज्य विज्ञान महाविद्याल्यात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन वाणिज्य पदवीधर झालो. पण या कार्यकाळात महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनामुळे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला आणि मला यश मिळाले. पण मला मिळालेले यश व माझे भविष्य घडविण्यात सुशिलामाई काळे महाविद्यालयाचा मोठा वाटा असल्याचे विलास जाधव यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त व गव्हर्निंग कौंन्सिलचे सदस्य कारभारी जाधव, कारभारी आगवन, भास्करराव आवारे, सिकंदर पटेल, ज्ञानदेव मांजरे, बाळासाहेब बारहाते, चंद्रकांत औताडे, दिलीप चांदगुडे, किसन पाडेकर, सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, गौतम पॉलिटेक्‍निक इन्स्टीट्युटचे प्राचार्य सुभाष भारती आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन केशव दळवी यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)