नवी दिल्ली – मोदी सरकारच्या विरोधात राजकीय संघर्ष छेडण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षासह 12 विरोधी पक्षांच्या युवक शाखांनी संयुक्त आघाडी स्थापन केली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडी स्थापन करण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांमधील पहिले पाऊल म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे.

केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार हटवणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे युवक शाखांच्या संयुक्त आघाडीने म्हटले आहे. या आघाडीने 28 सप्टेंबरपासूून मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा संकल्प जाहीर केला आहे. या आघाडीत राजद, रालोद, ऑल इंडिया मुस्लिम लीग, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, माकप, जेडीएस, द्रमुक, झामुमो आदी पक्षांच्या युवक शाखाही सहभागी झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)