विरोधी पक्षनेत्यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांना पवना जलवाहिनी होणार असे आश्‍वासन देणारे पालक मंत्री व भाजप आमदारांनी राष्ट्रवादीवर आरोप करण्याऐवजी पवना जलवाहिनी बद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केले आहे.

दत्ता साने यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सत्ताधारी हे पवना जलवाहिनीचे राजकारण करत असून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. राष्ट्रवादीने विकासाचे “व्हिजन’ डोळ्यासमोर ठेऊन हा प्रकल्प सुरु केला होता. मात्र भाजपनेच हा प्रकल्प बंद पाडला. गेली चार वर्ष भाजपच सत्तेमध्ये आहे. मात्र या प्रकल्पाबाबत पालक मंत्री गिरीष बापट व आमदार लक्ष्मण जगताप यांची भूमिका एकच आहे. तर आमदार बाळा भेगडे हे जलवाहिनीच्या विरोधात आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवडमध्ये एक तर मावळमध्ये दुसरी भूमिका ठेवत राजकारण करुन मलिदा खाण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप दत्ता साने यांनी केला आहे. सत्ता परिवर्तन झाल्यानंतरच विकास प्रकल्पांना खिळ बसली. त्यामुळे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादीच्या नावाने बरळण्यापेक्षा पालकमंत्री व आमदार यांच्यात योग्य तो समन्वय साधून एकच भूमिका स्पष्ट करावी, असा सल्लाही साने यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)