विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंना भाजपची ऑफर !

नगर: आदर्श गोपालक व प्रगतशिल पुरस्कार वितरण कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगली. ना. विखेंनी भाषणात कृषीमंत्री असतानाचे किस्से सांगितले. तोच धागा पकडून तुम्हाला कृषिमंत्री युती सरकारच्याच काळात होते. तुम्ही भाजपात आला तर तुमचे स्वागतच होईल. युतीची पुन्हा सत्ता येईल आणि कृषि खाते तुम्हाला मिळेल, अशी जाहीर ऑफर पालकमंत्री राम शिंदे यांनी जाहीरपणे दिली.

या राजकीय कलगीतुऱ्याने उपस्थित गोपाल-शेतकऱ्यांची चांगलीच करमणूक झाली. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सुरुवातीला अध्यक्षा विखे यांनी पालकमंत्र्यांना टोमणा मारला. शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी नियोजन समितीतून निधी देण्याची मागणी केली. आम्ही तुमच्याकडे एकतर काही मागत नाही. आणि मागितलंच तरी भेटत नाही. मागितलेलंही आम्हाला कोर्टात जाऊन मिळवावं लागत,असं म्हणत राजकीय कुरघोड्यांना सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांच्यानंतर अकोल्यातील बियाणे बॅंक तयार केलेल्या राहीबाई पोपेरे यांनी मनोगत व्यक्‍त केले. त्या म्हणाल्या, बियाण्यांच जुनं वाण जपल पाहिजे. तरच आरोग्याचे प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. तोच धागा पकडून राधाकृष्ण विखेंनी आपल्या भाषणात जुने आहे त्याच संवर्धन करा, त्यामुळे आपल्याला पुन्हा जुन्याकडे वळावंच लागेल, असे म्हणत कॉंग्रेसची सत्ता येणार असल्याचा अप्रत्यक्ष दावा केला. विखेंच्या या दाव्याला प्रत्युत्तर देणार नाही ते राम शिंदे कसले? त्यांनीही विखेंना मिळालेले कृषिमंत्रीपद हे युती सरकारच्या काळातीलच असल्याची आठवण करून देत भाजप प्रवेशाची ऑफर दिली.
पालकमंत्री यांनी दिलेल्या ऑफरवर थोरात यांनी कडी केली. अनेक खात्यांचा कारभार असल्याने ना. शिंदेंना ना. विखेंचे वक्तव्य नीट लक्षात आले नाही. जुने ते सोन म्हणजे काही 1997- 98 चे पक्ष नाही. तर 133 वर्षांची परंपरा असलेला पक्ष असे विखेंना म्हणायचे होते, असे सांगत राम शिंदेंनी दिलेल्या एकतर्फी ऑफरला एकतर्फीच धुडकावून लावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)