विरोधकांनी नारळ फोडले, तरी आम्ही गप्प राहू

आमदार भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचे नाव न घेता लगावला टोला

रेडा- राष्ट्रवादी कॉंग्रेसने मंजूर केलेल्या कामाचे नारळ जरी विरोधक फोडीत असतील तरी, आम्ही त्यांना काही बोलणार नाही. कारण जनतेला पक्के माहिती आहे की, ही कामे राष्ट्रवादी कॉंग्रेस करते आहे, त्यामुळे एखाद्या दुसऱ्या कामाचे नारळ फोडले तरी काही फरक पडणार नाही. तसेच जनतेची कामे मार्गी लागतील यासाठी आम्ही धडपडतो मात्र विरोधक जनतेची दिशाभूल करतात, असा टोला आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला.
इंदापूर तालुक्‍यातील काटी येथे 8 कोटी 10 लाख रकमेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 24) पार पडले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले, राष्ट्रवादी युवकचे राज्य उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, प्रताप पाटील, पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे निमंत्रित सदस्य सोमेश्‍वर वाघमोडे,भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य सचिन आरडे, तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वैभव वाघमोडे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस जहांगीर शेख, इंदापूर तालुका युवक नाभिक महामंडळाचे अध्यक्ष पंकज सूर्यवंशी, अनिल काळे, वसंत आरडे, तात्यासाहेब वडापुरे, दत्तात्रय बाबर, डॉ. शरद पडसळकर, सचिन सपकाळ, शेतकरी साहेबराव मोहिते यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व काटी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी निमगाव केतकी ते शेटफळ हवेली 2 कोटी 30 लाख, काटी ते लाखेवाडी 3 कोटी 50 लाख खर्चाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र काटी ही इमारत 1 कोटी 59 लक्ष रक्कम खर्चून उभी करण्यात येणार आहे, या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रवीण माने, अभिजीत तांबेले व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्‍त केले.

  • काटी गावच्या प्रेमाला विसरणार नाही
    ज्यांनी आपल्याला, आपल्या गावाला मदत केली आहे. विकासाचा अंकुर फुलवला आहे. या गोष्टीची जाण काटी गावकऱ्यांना सातत्याने असते. त्यामुळे हे गाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराशी कायमस्वरूपी एकरूप झाले आहे. याच काटी गावाने दिलेल्या प्रेमाला कदापी विसरणार नाही. वाटेल तेवढा विकासासाठी निधी दिला जाईल, अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)